निवडणूक लढवण्यासाठी मनीष सिसोदियांनी जनतेकडे मागितली देणगी, म्हणाले, १० वर्षे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 18:26 IST2024-12-30T18:26:29+5:302024-12-30T18:26:59+5:30

Delhi Assembly Election 2024: मी दहा वर्षे इमानदारीने राजकारण केलं, पण पैसे कमावले नाहीत. त्यामुळे आता निवडणूक लढवण्यासाठी मला निधीची आवश्यकता आहे, त्यासाठी मी एक संकेतस्थळ तयार केलं असून, तिथून तुम्ही देणगी देऊ शकता, असं आवाहन मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी केलं आहे

Delhi Assembly Election 2024: Manish Sisodia asks for donations from the public to contest elections, says, 10 years... | निवडणूक लढवण्यासाठी मनीष सिसोदियांनी जनतेकडे मागितली देणगी, म्हणाले, १० वर्षे...

निवडणूक लढवण्यासाठी मनीष सिसोदियांनी जनतेकडे मागितली देणगी, म्हणाले, १० वर्षे...

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि जंगपुरा विधानसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार मनीष सिसोदिया यांनी निडणूक लढवण्यासाठी देणगी देण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. मी दहा वर्षे इमानदारीने राजकारण केलं, पण पैसे कमावले नाहीत. त्यामुळे आता निवडणूक लढवण्यासाठी मला निधीची आवश्यकता आहे, त्यासाठी मी एक संकेतस्थळ तयार केलं असून, तिथून तुम्ही देणगी देऊ शकता, असं आवाहन मनीष सिसोदिया यांनी केलं आहे.

जनतेकडे देणगी मागताना मनीष सिसोदिया म्हणाले की, मागच्या दहा वर्षांमध्ये मी इमानदारीने राजकारण केलं आहे. मी आता जंगपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. जनताच मला निवडणूक लढवण्यास मदत कलेल, अशी मला अपेक्षा आहे. ही निवडणूक लढवण्यासाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी मी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. तिथून तुम्ही ऑनलाइन देणगी देऊ शकता.

ही देणगी दिल्यानंतर तुम्हाला एक ८०जी चा मेल मिळेल. हा फंड आम्ही पारदर्शक ठेवला आहे. किती देणगी आली आहे आणि कुणिी देणगी दिली आहे, ते त्यावर दिसेल. जर कुणाला देणगी गोपनीय ठेवायची असेल तर तो ती गोपनीय ठेवू शकतो. त्याचाही पर्याय उपलब्ध असेल, असे मनीष सिसोदिया यांनी सांगितले. तसेच शिक्षण क्षेत्रात परिवर्तनाचं राजकारण करण्यासाठी मला देणगी द्या, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.  

Web Title: Delhi Assembly Election 2024: Manish Sisodia asks for donations from the public to contest elections, says, 10 years...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.