"ज्याची भीती होती तेच झालं...! हे आले तर..."; भाजपची घोषणा 'बदल के रहेंगे'वरून अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 21:55 IST2024-12-07T21:54:35+5:302024-12-07T21:55:21+5:30

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या 'बदलकर रहेंगे' घोषणेवरून पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे...

delhi assembly election 2025 aam aadmi party leader arvind kejriwal targeted bjp over slogan | "ज्याची भीती होती तेच झालं...! हे आले तर..."; भाजपची घोषणा 'बदल के रहेंगे'वरून अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल

"ज्याची भीती होती तेच झालं...! हे आले तर..."; भाजपची घोषणा 'बदल के रहेंगे'वरून अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील राजकारणाचा पारा तापताना दिसत आहे. येथे आम आदमी पार्टी आणि भाजप एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या 'बदलकर रहेंगे' घोषणेवरून पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. "भाजपने आपले इरादे स्पष्ट केले आहेत आणि जर यांना मतदान केले, तर हे 'आप'ने केलेली कामे बदलतील," असे केजरीवाल यांनी म्हटेल आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले, आज भाजपने 'बदल के रहेंगे', अशी घोषणा दिली आहे. ज्याची भीती होती तेच झाले. मी आधीच सांगितले होते की, यांना मत दिले तर आम आदमी पक्षाच्या सरकारने गेल्या दहा वर्षांत दिल्लीतील जनतेच्या सोबतीने, जी कामे केली आहेत, ती सर्व कामे हे लोक बंद करतील.

'मोफत वीज बंद करतील' -
माजी मुख्यमंत्री केजरीवाल पुढे म्हणाले, "आज त्यांनी अधिकृतपणे सर्व काही बदलणार असल्याची घोषणा केली आहे. अर्थात, 24 तास वीज बंद होईल, पुन्हा लोअडशेडिंग सुरू होईल, मोफत वीज बंद होईल, हजारो रुपये महिन्याचे वीज बिल यायला सुरुवात होईल, महिलांचा मोफत बस प्रवास बंद होईल, सर्व सरकारी शाळा पुन्हा बर्बाद होतील, सर्व मोहल्ला क्लिनिक बंद केले जातील, सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये मिळणारी मोफत औषधी आणि उपचार बंद होतील, अत्यंत काळजीपूर्वक मतदान करा. यांनी यांची भावना स्पष्ट केली आहे."

कायदा आणि सुव्यवस्थेवरूनही भाजपवर निशाणा - 
अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्न चिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "आज सकाळी झोपेतून उठलो तेव्हा समजले की, दिल्लीतील विश्वास नगरमध्ये मॉर्निंग वॉक करून आपल्या घराकडे निघालेल्या एका भांडे व्यापाऱ्याची रस्त्यात आठ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोन जण मोटारसायकलवरून आले आणि त्यांची हत्या करून फरार झाले. एक दिवस दिल्लीचे वातावरण असे होईल याची कधी कल्पनाही केली नव्हती."

Web Title: delhi assembly election 2025 aam aadmi party leader arvind kejriwal targeted bjp over slogan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.