'CBI मनीष सिसोदियांच्या घरावर छापा टाकणार,' अरविंद केजरीवालांचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 19:01 IST2025-01-06T19:00:45+5:302025-01-06T19:01:16+5:30

Delhi Assembly Election 2025: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठा दावा केला आहे.

Delhi Assembly Election 2025: 'CBI will soon raid Manish Sisodia's house,' Arvind Kejriwal's shocking claim | 'CBI मनीष सिसोदियांच्या घरावर छापा टाकणार,' अरविंद केजरीवालांचा धक्कादायक दावा

'CBI मनीष सिसोदियांच्या घरावर छापा टाकणार,' अरविंद केजरीवालांचा धक्कादायक दावा

Delhi Poll 2025: दिल्ली विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकारणाचा पारा वाढतोय. सत्ताधारी आप आणि भाजपमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी एक मोठा दावा केला आहे. येत्या काही दिवसांत माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआय छापा टाकला जाणार असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे.

काय म्हमाले केजरीवाल?
अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, "मी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अटक केली जाईल आणि आपच्या काही नेत्यांवर छापे टाकले जातील. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, CBI येत्या काही दिवसांत मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकणार आहे. पण, आम आदमी पक्ष हा प्रामाणिक पक्ष आहे.' 

'भाजपचा दिल्ली निवडणुकीत पराभव होणार आहे. त्यामुळेच या अटक आणि छापे टाकले जातील. आजपर्यंत त्यांना आमच्या विरोधात काहीही सापडले नाही, भविष्यातही त्यांना काही सापडणार नाही,' असा मोठा दावा त्यांनी केला.

भाजपचा डाव, आम्ही घाबरत नाही 
डिसेंबरमध्ये अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे नाव न घेता दावा केला होता की, महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजनेच्या घोषणेनंतर हे लोक घाबरले आहेत. सीएम आतिशीला खोटे प्रकरण तयार करून अटक करण्याचे नियोजन सुरू आहे. भाजपवाले कितीही कारस्थानं केली तरी दिल्लीची जनता आपच्या बाजूने उभी आहे, असे आपने म्हटले होते. 

Web Title: Delhi Assembly Election 2025: 'CBI will soon raid Manish Sisodia's house,' Arvind Kejriwal's shocking claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.