Delhi Election Result: 'आय लव्ह यू' म्हणत अरविंद केजरीवालांचा 'दिलवाल्या' दिल्लीकरांना 'फ्लाइंग किस'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 04:49 PM2020-02-11T16:49:39+5:302020-02-11T16:50:41+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेचे आभार व्यक्त केले आहेत.
नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेचे आभार व्यक्त केले आहेत. आपच्या देदीप्यमान विजयानंतर दिल्लीस्थित पार्टीच्या कार्यालयातून अरविंद केजरीवालांना भारत माता की जयचा जयघोष केला आहे. तसेच दिल्लीवाल्यानं भारीच काम केलं आहे. दिल्लीवालो I LOVE YOU, असंही केजरीवाल म्हणाले आहेत.
केजरीवाल म्हणाले, फक्त दिल्लीच नव्हे, तर हा भारत मातेचा विजय आहे. हे नव्या पद्धतीचं राजकारण आहे. मी सर्वच दिल्लीवासीयांचा आभारी आहे. आम आदमी पार्टीवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी जनतेला धन्यवाद दिला आहे. अरविंद केजरीवाल कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, आज भगवान हनुमानाचा दिवस आहे. ज्यांनी दिल्लीच्या लोकांना आशीर्वाद दिलेला आहे.
आम्ही प्रार्थना करतो की भगवान हनुमानानं आम्हाला योग्य मार्ग दाखवावा, जेणेकरून येत्या पाच वर्षांपर्यंत जनतेची सेवा करता येईल. दिल्लीच्या लोकांनी मोठ्या विश्वासानं आम्हाला एवढ्या जागा दिल्या आहेत, आम्ही एकत्र येऊन 5 वर्षं मेहनत करणार आहोत.दिल्ली वालों गज़ब कर दिया।
— AAP (@AamAadmiParty) February 11, 2020
I Love You
- @ArvindKejriwalpic.twitter.com/tinjT4Unxs
Delhi Chief Minister Arvind Kejriwal celebrates with wife Sunita as AAP takes big lead #DelhiElectionResultspic.twitter.com/Ie2lKRVoyJ
— ANI (@ANI) February 11, 2020
'केजरीवाल देशद्रोही नसून कट्टर देशभक्त, दिल्लीकरांनी दाखवून दिलं'
दिल्ली विधानसभेत आपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं आता स्पष्ट झालंय. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना संबोधित करताना सिंह यांनी हा विजय जनतेचा असल्याचं म्हटलं. तसेच, दिल्लीच्या लोकांनी दाखवून दिलंय की, त्यांचा मुलगा देशद्रोही नसून कट्टर देशभक्त आहे. दिल्लीकरांनी दाखवलेल्या या विश्वासाबद्दल त्यांचे आभार, असेही संजय सिंह यांनी म्हटले आहे. मोदींनी आपल्या भाषणाता नाव न घेता केजरीवाल यांना देशद्रोही असे म्हटले होते. त्यास, सिंह यांनी निकालानंतर उत्तर दिलंय. दरम्यान, मोदींनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनतेला देशद्रोहाविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार दिल्लीतील जनतेने दाखवून दिले आहे. मोदींचा सल्ला ऐकून दिल्लीतील जनतेनं मतदान प्रक्रियेतून भाजपाला देशद्रोही घोषित केल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.
अपने बेटे को इतना प्यार देने के लिए दिल्लीवसियों का तहे दिल से शुक्रिया। आज दिल्ली वालों ने एक नई राजनीति को जन्म दिया “काम की राजनीति”। ये भारत माता की जीत है। जय हिंद। pic.twitter.com/q5xP8ytYvc
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 11, 2020