'अरविंद केजरीवाल रोहिंग्या मुस्लिमांना पाठिंबा देतात', अनुराग ठाकूर यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 19:11 IST2025-01-05T19:10:29+5:302025-01-05T19:11:39+5:30

Delhi Assembly Elections 2025: 'यंदा दिल्लीतील जनतेने भाजपला विजयी करण्याचा निर्णय घेतलाय.'

Delhi Assembly Elections 2025, Arvind Kejriwal supports Rohingya Muslims, Anurag Thakur's blunt criticism | 'अरविंद केजरीवाल रोहिंग्या मुस्लिमांना पाठिंबा देतात', अनुराग ठाकूर यांची बोचरी टीका

'अरविंद केजरीवाल रोहिंग्या मुस्लिमांना पाठिंबा देतात', अनुराग ठाकूर यांची बोचरी टीका

Delhi Assembly Elections 2025:दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवस उरले आहेत. अशा स्थितीत भाजप आणि आमपच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. अशातच, भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी रविवारी (5 जानेवारी 2025) अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली. 'आप प्रमुखांनी दिल्ली लुटण्याचे काम केले. दिल्लीतील जनतेला केजरीवालांपासून मुक्ती हवीये,' अशी टीका ठाकूर यांनी केली.

अनुराग ठाकूर पुढे म्हणतात, 'यंदा दिल्लीतील जनतेने भाजपला विजयी करण्याचा निर्णय घेतलाय. केजरीवाल हे भ्रष्टाचाराचे उदाहरण बनले आहे. त्यांचे सर्व नेते तुरुंगात आहेत. आम आदमी पार्टी दिल्लीसाठी आपत्ती आहे. आम आदमी पक्षाकडे आता चेहरा राहिलेला नाही. दिल्लीत भाजपचा कार्यकर्ताच मुख्यमंत्री होणार.'

रोहिंग्या मुस्लिमांबद्दल काय म्हणाले?
'अरविंद केजरीवाल रोहिंग्या मुस्लिमांना व्होट बँकेच्या राजकारणासाठी पाठिंबा देताहेत. त्यांची मते कापली जातात, तेव्हा केजरीवालांना वेदना होतात. ममता बॅनर्जी यांना रोहिंग्या मुस्लिमांना देशात स्थायिक करायचे आहे. ममता बॅनर्जी या बांग्लादेशी मुस्लिमांचे आश्रयस्थान बनल्या आहेत. केजरीवाल आणि ममता तुष्टीकरणाचे राजकारण करतात. केजरीवाल आणि ममता व्होट बँकेच्या राजकारणासाठी देशाच्या सुरक्षेशी तडजोड करताहेत,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Web Title: Delhi Assembly Elections 2025, Arvind Kejriwal supports Rohingya Muslims, Anurag Thakur's blunt criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.