VIDEO: "बाप तो बाप रहेगा..."; विजयानंतर आतिशी यांचा जोरदार रोड शो अन् जबरदस्त डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 22:49 IST2025-02-08T22:45:12+5:302025-02-08T22:49:48+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मावळत्या मुख्यमंत्री आतिशी यांनी डान्स करत आपला आनंद व्यक्त केला.

VIDEO: "बाप तो बाप रहेगा..."; विजयानंतर आतिशी यांचा जोरदार रोड शो अन् जबरदस्त डान्स
Delhi Assembly Elections Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा हादरा बसला आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षाला केवळ २२ जागा मिळवता आल्या. निवडणुकीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज आणि इतर अनेक बडे नेतेही पराभूत झाले आहेत. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पराभव स्वीकारला असून आपण लोकांसाठी काम करत राहू असे म्हटले आहे. दुसरीकडे आपच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी विजय मिळवला आहे. आतिशी यांनी भाजपच्या रमेश बिधुरींचा पराभव केला आहे. विजयानंतर आतिशी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत 'बाप तो बाप रहेगा' या गाण्यावर जोरदार डान्सही केला.
आपच्या प्रमुख नेत्या आतिशी यांनी कालकाजी विधानसभा जागेवर विजय मिळवला. आतिशी यांनी भाजपच्या रमेश बिधुरी यांचा ३५०० हून अधिक मतांनी पराभव केला आहे. आतिशी यांच्या विजयामुळे भाजपच्या विधानसभेत आपला आवाज उठवण्याची संधी मिळणार आहे. दिल्लीतून सरकार गेल्याने एकीकडे आपचे नेते चिंतेत असताना दुसरीकडे आतिशी आणि त्यांच्या समर्थकांनी नाचत आपला विजय साजरा केला. आतिशी यांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मावळत्या मुख्यमंत्री आतिशी जेव्हा त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या तेव्हा त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. आतिशी यांनी आपल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघात भव्य रोड शो केला. आतिशी यांनी वाहनात बसून लोकांचे आभार मानले. यावेळी त्यांचे समर्थक विविध गाण्यांवर डान्स करत होते. एका व्हिडीओमध्ये आतिशी यादेखील 'बाप तो बाप रहेगा' या गाण्यावर डान्स करताना दिसल्या.
#WATCH | #DelhiElectionResults | AAP winning candidate from Kalkaji Vidhan Sabha and outgoing CM Atishi dances and celebrates her victory with the supporters and party workers. pic.twitter.com/nGbItW5nM7
— ANI (@ANI) February 8, 2025
आतिशी यांचा व्हिडिओ शेअर करत आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी टोला लगावला आहे. "हे कसलं निर्लज्ज प्रदर्शन आहे? पक्षाचा पराभव झाला आहे, सर्व मोठे नेते हरले आहेत आणि आतिशी मार्लेना असा आनंद साजरा करत आहेत," असं स्वाती मालीवाल यांनी म्हटलं.