"आयुष्यात मी पहिल्यांदा भाजपला मतदान केले", मौलाना साजिद रशिदी यांचे धक्कादायक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 17:09 IST2025-02-06T11:27:22+5:302025-02-06T17:09:26+5:30

Sajid Rashidi Claims He voted for BJP : यासंदर्भातील व्हिडिओ भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

Delhi Assembly Elections : Sajid Rashidi of All India Imam Association claims he voted for BJP, stuns everyone | "आयुष्यात मी पहिल्यांदा भाजपला मतदान केले", मौलाना साजिद रशिदी यांचे धक्कादायक विधान

"आयुष्यात मी पहिल्यांदा भाजपला मतदान केले", मौलाना साजिद रशिदी यांचे धक्कादायक विधान

Sajid Rashidi Claims He voted for BJP : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. आता मतमोजणी ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. दरम्यान, ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजिद रशिदी यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाला (भाजप) मतदान केल्याचे साजिद रशिदी यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील व्हिडिओ भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

व्हिडिओमध्ये साजिद रशिदी यांनी म्हटले आहे की, "मित्रांनो, मी मतदान केले आहे. दिल्लीत कोणाचे सरकार स्थापन होणार आहे. मी कोणाला मतदान केले, हे जाणून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. मी भाजपला मतदान केले आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी भाजपला मतदान केले आहे. हे का केले? याची अनेक कारणे आहेत. आतापर्यंत मुस्लिमांवर भाजपला पराभूत करण्यासाठी मतदान केल्याचा आरोप आहे. मात्र, मी हे मतदान यासाठी केले आहे की, आज दिल्लीत भाजप जिंकावी. याची इतरही अनेक कारणे आहेत."

दरम्यान, ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे साजिद रशिदी यांनी भाजपला मतदान केल्याच्या दाव्यानंतर, अमित मालवीय यांनी पोस्टमध्ये लिहिले की, 'ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे साजिद रशिदी म्हणतात की, त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान केले. हे एकमेव प्रकरण नाही. जर मुस्लिमांनीही मोठ्या संख्येने भाजपला पाठिंबा दिले तर तथाकथित 'धर्मनिरपेक्ष' पक्षांना चिंता करावी लागणार आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी आपपेक्षा भाजप वरचढ ठरणार असल्याचे बुधवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या विविध एग्झिट पोलच्या निष्कर्षांत म्हटले आहे. काँग्रेसला यश मिळण्याची शक्यता नाही, असेही त्यात म्हटले आहे. निवडणुकांत ७० जागांसाठी बुधवारी मतदान झाले व ८ फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. 

Web Title: Delhi Assembly Elections : Sajid Rashidi of All India Imam Association claims he voted for BJP, stuns everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.