दिल्लीत सम-विषम फॉर्म्युला १५ जानेवारीपर्यंत सुरु रहाणार

By admin | Published: January 11, 2016 11:39 AM2016-01-11T11:39:59+5:302016-01-11T11:39:59+5:30

दिल्ली सरकारकडून प्रायोगिक तत्वावर सुरु असलेली गाडयांसाठीची सम-विषम योजना आधी ठरल्याप्रमाणे १५ जानेवारीपर्यंत सुरु रहाणार आहे.

In Delhi, the asymmetrical formula will continue until January 15 | दिल्लीत सम-विषम फॉर्म्युला १५ जानेवारीपर्यंत सुरु रहाणार

दिल्लीत सम-विषम फॉर्म्युला १५ जानेवारीपर्यंत सुरु रहाणार

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ११ -  दिल्ली सरकारकडून प्रायोगिक तत्वावर सुरु असलेली गाडयांसाठीची सम-विषम योजना आधी ठरल्याप्रमाणे १५ जानेवारीपर्यंत सुरु रहाणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारने गाडयांची सम-विषम योजना राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
गाडयांच्या सम-विषम फॉर्म्युल्यासंबंधी याचिकाकर्त्यांनी जे आक्षेप उपस्थित केले आहेत ते ध्यानात घेण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला निर्देश दिले. या योजनेविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी आपला निर्णय राखून ठेवला होता. 
उच्च न्यायालयाने दिल्लीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी असल्याने लोकांची गैरसोय होत असल्याचे मत नोंदवत टीका केली होती. या सम-विषम फॉर्म्युल्यासंबंधी पुढील सुनावणी आता १५ फेब्रुवारीला होणार आहे. 

Web Title: In Delhi, the asymmetrical formula will continue until January 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.