दिल्ली झाली थंडीची ‘राजधानी’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 08:09 AM2023-01-06T08:09:50+5:302023-01-06T08:10:11+5:30
बुधवारी सायंकाळपासून तापमानात मोठ्या प्रमाणात घट होण्यास सुरुवात झाली. गुरुवारी पहाटे दिल्लीतील किमान तापमानाची नोंद ३ अंश सेल्सिअस झाली.
नवी दिल्ली : दिल्लीत या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद गुरुवारी पहाटे झाली. दिल्लीत ३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पुढील तीन दिवस दिल्लीत थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
बुधवारी सायंकाळपासून तापमानात मोठ्या प्रमाणात घट होण्यास सुरुवात झाली. गुरुवारी पहाटे दिल्लीतील किमान तापमानाची नोंद ३ अंश सेल्सिअस झाली. हे या मोसमातील सर्वात कमी तापमान आहे. सरासरीपेक्षा ३ अंश सेल्सिअसने कमी आहे. गुरुवारी सकाळी दिल्लीच्या आकाशात धुक्याची चादर होती. यामुळे काही विमाने उशिराने उडाली. ८ जानेवारीनंतर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
पाईपमधून बर्फ
काश्मीरात अनेक ठिकाणी पारा उणे ५ अंशांच्या खाली गेला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमधील पाणी गोठले आहे. पाणी घेण्यासाठी लोकांना पाईपलाईनच्या खाली आग लावावी लागत आहे.