'ते' पाच मृतदेह आले कुठून?; हत्या, तंत्र मंत्र की आणखी काही?... गूढ वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 12:47 PM2020-02-13T12:47:04+5:302020-02-13T12:56:35+5:30

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतल्या भजनपुरा भागात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

delhi bhajanpura home family corpses murders suicide apprehension investigation police | 'ते' पाच मृतदेह आले कुठून?; हत्या, तंत्र मंत्र की आणखी काही?... गूढ वाढलं

'ते' पाच मृतदेह आले कुठून?; हत्या, तंत्र मंत्र की आणखी काही?... गूढ वाढलं

Next
ठळक मुद्देएकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक चौकशीत ही आत्महत्या असल्याचं बोललं जात होतं. परंतु शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.त्यांची आत्महत्या नव्हे, तर धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे.

नवी दिल्लीः देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतल्या भजनपुरा भागात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक चौकशीत ही आत्महत्या असल्याचं बोललं जात होतं. परंतु शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यांची आत्महत्या नव्हे, तर धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे. सर्वच मृतदेहांच्या मानेवर आणि शरीराच्या इतर भागांवर जखमेच्या खुणा सापडल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी आता हत्येचा गुन्हा दाखल केला असून, चौकशी सुरू केली आहे. त्यांची हत्या कोणत्या कारणास्तव करण्यात आली, याचा पोलीस शोध घेत आहेत. 

भजनपुरा परिसरातील राहत्या घरात पाच जणांचे मृतदेह आढळले होते. या मृतदेहांमध्ये तीन मुलांसह एक महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. या मृतदेहांची ओळख पटली असून ते एकाच कुटुंबातील आहेत. यातील पुरुष हा रिक्षा चालक होता, असे सांगण्यात येत आहे. तसेच ते या घरात भाड्यानं राहत असल्याचीही माहिती मिळत आहे. पती-पत्नीशिवाय तीन मुलंसुद्धा इथे राहत होती.

शंभूनाथ (43) आपली पत्नी सुनीता (38)आणि मुलगी कोमल (16)सह मुलगा सचिन (14) आणि छोटा मुलगा शिवमबरोबर इथे राहत होते. त्यांच्या घराला बाहेरून टाळं लावण्यात आलं होतं. घरातून दुर्गंधी येत असल्यानं शेजारच्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी टाळं तोडून घरात प्रवेश केल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. 

Web Title: delhi bhajanpura home family corpses murders suicide apprehension investigation police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.