3 व्यासपीठ, 150 पाहुणे, 30000 समर्थक अन्...! दिल्ली CM पदाच्या शपथविधीसाठी भाजपची तयारी, कोण कोण राहणार उपस्थित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 20:11 IST2025-02-17T20:08:19+5:302025-02-17T20:11:48+5:30

या शपथविधी समारंभासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 50 हून अधिक हाय सिक्योरिटी असलेले नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते...

delhi bjp chief minister oath ceremony 3 stage, 150 guests, 30000 supporters BJP's preparations for the swearing-in ceremony of Delhi CM, who will be present | 3 व्यासपीठ, 150 पाहुणे, 30000 समर्थक अन्...! दिल्ली CM पदाच्या शपथविधीसाठी भाजपची तयारी, कोण कोण राहणार उपस्थित?

3 व्यासपीठ, 150 पाहुणे, 30000 समर्थक अन्...! दिल्ली CM पदाच्या शपथविधीसाठी भाजपची तयारी, कोण कोण राहणार उपस्थित?

दिल्लीत राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. पुढच्या ४८ तासांत, दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असणार? हे निश्चित होईल. खरे तर, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४८ जागा जिंकल्या आहेत. आता पक्षाचे लक्ष मुख्यमंत्री नवडीवर आणि शपथविधीच्या तयारीवर आहे.

दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर 20 फरवरीला नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विविध सरकारी विभाग आणि संबंधित संस्था तयारीत व्यस्त आहेत. रामलीला मैदानाटी स्वच्छता आणि सजावटीचे काम सुरू आहे. अनेक संस्था सुरक्षा व्यवस्थेच्यादृष्टीने काम करत आहेत. 

या शपथविधी सोहळ्यसाठी रामलीला मैदानावर मोठ्या प्रमाणावर कारपेट, सोफे आणि व्हाइट वॉशचे काम करण्यात येत आहे. जेसीबीच्या मदतीने जागा व्यवस्थित केली जात आहे. तेसेच पाहीही शिंपडले जात आहे. याशिवया, या समारंभासाठी 3 व्यासपीठ तयार करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी 150 पाहुणे मंडळी राहणार आहेत. महत्वाचे म्हणजे, या भव्य समारंभात 20-30 हजार लोक सहभागी होण्याचा अंदाज आहे.

शपथविधी समारंभासाठी कोण कोण राहणार उपस्थित -
या शपथविधी समारंभासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 50 हून अधिक हाय सिक्योरिटी असलेले नेते उपस्थित राहतील. याशिवाय, 20 राज्यांचे मुख्यमंत्री देखील या वेळी उपस्थित राहतील. तसेच, सर्व केंद्रीय मंत्री आणि एनडीएतील नेत्यांनाही या समारंभाचे आमंत्रण आहे. विशेष म्हणजे, शेतकरी, लाडक्या बहिणी आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने तैनात केलेले कार्यकर्त्येही या कार्यक्रमास उपस्थित हारणार असल्याचे समजते.

Web Title: delhi bjp chief minister oath ceremony 3 stage, 150 guests, 30000 supporters BJP's preparations for the swearing-in ceremony of Delhi CM, who will be present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.