बाबो! बॉडी बनवण्याच्या नादात त्याने घेतलं घोड्याचं इंजेक्शन आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 03:05 PM2018-10-20T15:05:59+5:302018-10-20T15:10:54+5:30

अलिकडे तरुणाईमध्ये बॉडी बनवण्याचं किंवा सिक्स पॅक तयार करण्याचं भलतंच फॅड बघायला मिळतं.

Delhi Boy Injects Drug for Horses for Bodybuilding Lands in the Hospital | बाबो! बॉडी बनवण्याच्या नादात त्याने घेतलं घोड्याचं इंजेक्शन आणि...

बाबो! बॉडी बनवण्याच्या नादात त्याने घेतलं घोड्याचं इंजेक्शन आणि...

googlenewsNext

(Image Credit : diabeticmuscleandfitness.com)

अलिकडे तरुणाईमध्ये बॉडी बनवण्याचं किंवा सिक्स पॅक तयार करण्याचं भलतंच फॅड बघायला मिळतं. अशात कुणीही त्यांना दिलेल्या सल्ल्यावर लगेच विश्वास ठेवतात आणि मग त्यांना पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाहीत. असंच काहीसं दिल्लीतील नजफगढच्या एका तरुणासोबत घडलं आहे. येथील एका २१ वर्षीय तरुणाने बॉडी बनवण्यासाठी घोड्यांना दिलं जाणारं औषध घेण्यास सुरुवात केली. 

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सुरेश(बदललेलं नाव) हा येथील एका पोलिसाचा मुलगा आहे. सुरेशला बॉडी बिल्डींगची फारच आवड. अशात त्याला त्याच्या कोचने AMP5 कंपाउंड हे औषध घेण्यास सांगितले. हे औषध दिवसभर काम करणाऱ्या घोड्यांना दिलं जातं. काही खास केसेसमध्ये हे औषध मनुष्यांनाही दिलं जातं. पण तोंडावाटे घेण्यासाठी इंजेक्शनने नाही.

AMP5 चा वापर करु लागल्यावर सुरेश फारच आनंदी होता. डॉक्टरांना त्यांने सांगितले की, 'हे औषध घेण्याचा सल्ला त्याला त्याच्या कोचने दिला होता. त्यांनी सांगितलं होतं की, हे औषध घेतल्याने तुला जास्त एनर्जी येईल. या औषधाने मला फारच एनर्जेटिक वाटत होतं. मी जास्त व्यायाम करु लागलो होतो. मला बदल दिसत होता. त्यामुळे मी औषध घेण्याचं प्रमाण वाढवलं. यादरम्यान मी अनेक अवॉर्डही जिंकले'.

सगळंकाही ठिक सुरु होतं पण जेव्हा सुरेशने हे औषध घेणं बंद करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला त्रास होऊ लागला. बॉडी बिल्डींगचा कंटाळा आल्याने त्याला शिक्षणावर लक्ष द्यायचं होतं. पण तो इच्छा असूनही AMP5 औषध सोडू शकत नव्हता. त्यामुळे त्याला आळस, सतत झोपणे आणि चिडचिड होणे या समस्या होऊ लागल्या होत्या. आता सुरेश एका हॉस्पिटलमध्ये मानसिक रोग चिकित्सा विभागात दाखल आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 

Web Title: Delhi Boy Injects Drug for Horses for Bodybuilding Lands in the Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.