दिल्ली गुन्हेगारीतही ठरली राजधानी! बलात्कार व गुन्ह्यांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 02:04 AM2017-12-01T02:04:29+5:302017-12-01T02:04:43+5:30
दिल्ली ही देशाची केवळ राजकीय राजधानी नसून गुन्हेगारीतही ती राजधानी असल्याचे चित्र ताज्या आकडेवारीवरून समोर आले आहे. देशात गुन्हेगारीचे प्रमाणही एकूणच वाढले असून २०१६ मध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल १.२० लाख जास्त गुन्ह्यांची नोंद
नवी दिल्ली : दिल्ली ही देशाची केवळ राजकीय राजधानी नसून गुन्हेगारीतही ती राजधानी असल्याचे चित्र ताज्या आकडेवारीवरून समोर आले आहे. देशात गुन्हेगारीचे प्रमाणही एकूणच वाढले असून २०१६ मध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल १.२० लाख जास्त गुन्ह्यांची नोंद
झाली आहे. दिल्ली असुरक्षित शहर ठरले आहे.
‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड््स ब्युरो’ने (एनसीआरबी) सन २०१६ मधील देशातील गुन्हेगारीच्या आकडेवारीचे संकलन करून तयार केलेला ‘क्राइम इन इंडिया २०१६’ हा अहवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गुरुवारी येथे प्रसिद्ध केला. ब्युरोने यंदा २० लाख किंवा त्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या १९ शहरांमधील गुन्हेगारीची आकडेवारीही प्रसिद्ध केली असून बेपत्ता व्यक्ती, बनावट नोटा व शस्त्रजप्तीची आकडेवारीही प्रथमच समाविष्ट करण्यात आली आहे.
अहवाल वर्षात देशातील गुन्हेगारी २.६ टक्क्यांनी वाढल्याचे दिसते. सन २०१५च्या तुलनेत २०१६ मध्ये एक लाख २० हजार ८३९ जास्त गुन्ह्यांची नोंद झाली. महिलांवरील अत्याचारांचे प्रमाणही वाढले. त्यात बलात्काराखेरीज विनयभंग, अपहरण आणि पती तसेच सासरच्या मंडळींनी छळ करण्याचा समावेश आहे. गेल्या चार वर्षांत प्रथमच देशातील एकूण गुन्हेगारीत महाराष्ट्राचा पहिल्या तीनमध्ये समावेश झाला आहे.
महाराष्ट्र, मुंबईचे चित्र
एकूण गुन्हेगारीत राज्य तिसरे
बलात्कारांत १०.७ टक्के वाढ
कोठडीत १२ कैद्यांचा मृत्यू
मुंबईत ५,१२८
महिलांवर अत्याचार
मुंबईत अपहरणाचे १,८७६ गुन्हे
मुंबईत ४,१९१ आर्थिक गुन्हे
सर्वाधिक ९८०
सायबर गुन्हे मुंबईत.