Arvind Kejriwal Corona Positive : अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण; रॅलीतील विनामास्क फोटो शेअर करत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 10:19 AM2022-01-04T10:19:51+5:302022-01-04T10:20:11+5:30
Arvind Kejriwal Corona Positive :अरविंद केजरीवाल कोरोनाबाधित झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांचे रॅलीतील विनामास्क फोटो शेअर करत केलं ट्रोल.
Delhi CM Arvind Kejriwal Corona Positive : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली. यासोबतच अरविंद केजरीवाल यांनी संपर्कात येणाऱ्या लोकांना स्वतःला विलगीकरण आणि चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, हे वृत्त समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी केजरीवाल यांचे विनामास्क फोटो शेअर करत त्यांना ट्रोल केलं आहे.
नेटकऱ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या पंजाब आणि चंडीगढमधील केजरीवाल यांच्या रॅलीचे फोटो शेअर केले आहेत. तसंच यासोबत त्यांनी 'Those who come in touch' असं कॅप्शनही देत आहेत. नेटकऱ्यांनी जे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत, ते एक दोन दिवसांपूर्वी केजरीवाल यांच्या चंडीगढ येथील रॅलींचे आहेत. यामध्ये ते विनामास्क दिसत आहेत. हे फोटो शेअर करत नेटकऱ्यांनी त्यांच्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, परंतु यात तर ते हजारो लोकांमध्ये विनामास्क दिसत आहेत, असंही म्हटलंय.
— Aashish Kulkarni (@aashish1212) January 4, 2022
Aapne ghabrana nai hai. Aap aapke saath positive hai. pic.twitter.com/XX36ImjFuC— अक्षय जैन (@akshayjain011) January 4, 2022
अरविंद केजरीवाल यांनी ३१ डिसेंबर रोजी पंजाबच्या पटियालामधून शांती मार्च काढला होता. यादरम्यान त्यांनी मास्कही लावला नव्हता. शिवाय त्यांच्या जवळपास मोठ्या प्रमाणात गर्दीही जमली होती. या गर्दीत अवघे काही लोक सोडले तर कोणाच्याही तोंडाला मास्क नाही.
काय म्हटलं केजरीवाल यांनी?
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असून, सौम्य लक्षणं आहेत. स्वत:ला घरातच विलगीकरणात ठेवले आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले, त्यांनीही कृपया स्वतःला विलगीकरणात राहावे आणि स्वतःची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.