“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 11:02 AM2024-05-27T11:02:02+5:302024-05-27T11:02:36+5:30

Arvind Kejriwal News: ते देवापेक्षा मोठे आहेत का? माझ्यासह आमच्या चार मोठ्या नेत्यांना खोट्या केसेसमध्ये तुरुंगात टाकून निवडणुका घेतल्या, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.

delhi cm arvind kejriwal criticised pm narendra modi and bjp in punjab tour | “पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका

“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका

Arvind Kejriwal News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम जामिनावर बाहेर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहे. या प्रचारांतून अरविंद केजरीवाल भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका करताना दिसत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीन यांच्याशी केली असून, पुतिन आणि शेख हसीना यांनी केले, तेच आता मोदी करू पाहात आहेत, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी हल्लाबोल केला.

पाच दिवसीय पंजाब दौऱ्यावर असलेले अरविंद केजरीवाल म्हणाले की, पाकिस्तानमध्ये इम्रान खानला तुरुंगात टाकले. निवडणुका झाल्या आणि खान यांचा पक्ष सत्तेबाहेर झाला. बांगलादेशात शेख हसीना यांनी सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले आणि निवडणुका जिंकल्या. रशियात व्लादिमीर पुतिन यांनीही तेच केले आणि प्रचंड बहुमताने विजयी झाले. नरेंद्र मोदींचा पराभव केला नाही तर देशाची लोकशाही आपण वाचवू शकणार नाही. हा देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे, असा मोठा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला.

लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आणि मला तुरुंगात टाकले

एक वेळ उपाशी राहू शकतो, पण हुकूमशाही सहन करणार नाही. इथे माझ्यासाठी नाही तर देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी आलो आहे. देश वाचवण्याची ताकद मतदारांमध्ये आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तुम्हा सर्वांना देश वाचवण्याचे आवाहन करायचे आहे. लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आणि मला तुरुंगात टाकले. आमचे नेते संजय सिंह, सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांनाही खोट्या खटल्यांखाली तुरुंगात टाकले आहे. आमच्या चार मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकल्यानंतर मोदीजी म्हणाले की, चला आता निवडणूक लढवू. मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन तुकडे केले, पक्षांची चिन्हे हिसकावून घेतली आणि म्हणाले की, चला निवडणूक लढू, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी निशाणा साधला.

दरम्यान, ते देवापेक्षा मोठे आहेत का? देवाने त्याचे विश्व निर्माण केले आणि आपल्याला या ग्रहावर आणले. पण त्यांच्या मते तो विश्वाचा निर्माता आहे आणि देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्यांचा अहंकार मोडायला हवा. ते तिसऱ्यांदा सत्तेत आले तर आरक्षण संपवतील. त्यामुळे तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, भगवंत मानांचे हात बळकट करा. जेणेकरून संसदेत आमचा आवाज उठवता येईल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
 

Web Title: delhi cm arvind kejriwal criticised pm narendra modi and bjp in punjab tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.