Delhi CM Arvind Kejriwal ED Custody: “जेलमधून सरकार चालवणार, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नाही देणार”; अरविंद केजरीवाल ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 09:10 AM2024-03-23T09:10:29+5:302024-03-23T09:11:01+5:30

Delhi CM Arvind Kejriwal ED Custody: कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा केवळ शंभर कोटींचाच नसून लाच देणाऱ्यांनी कमावलेल्या नफ्यातून सहाशे कोटींचाही यात समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे.

delhi cm arvind kejriwal in ed custody and said not resigns from chief minister post | Delhi CM Arvind Kejriwal ED Custody: “जेलमधून सरकार चालवणार, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नाही देणार”; अरविंद केजरीवाल ठाम

Delhi CM Arvind Kejriwal ED Custody: “जेलमधून सरकार चालवणार, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नाही देणार”; अरविंद केजरीवाल ठाम

Delhi CM Arvind Kejriwal ED Custody: शंभर कोटींच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे ‘सूत्रधार’ दिल्लीचे मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीकडून अटक करण्यात आली. पीएमएलए न्यायालयाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडीत रवानगी केली आहे. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते यामुळे आक्रमक झाले. इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांनीही अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही. जेलमधूनच सरकार चालवणार, असा ठाम निर्धार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. 

दिल्लीच्या जनतेचीही तीच इच्छा आहे. काही झाले तरी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही. जेलमधूनच सरकार चालवण्याचा प्रयत्न करणार आहे. अनेक अडचणी येतील, याची मला पूर्ण कल्पना आहे. मात्र, इथूनच काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी प्रकृती एकदम ठणठणीत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लगेचच इतक्या तातडीने ईडी मला अटक करण्यासाठी घरी येईल, असे वाटलेच नाही. मला अटक करण्यासाठी ईडीला दोन ते तीन दिवस लागू शकतील, असे मला वाटले. आई-वडिलांचा आशिर्वाद घेण्याची संधीही मिळाली नाही, अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली.

ईडीला चौकशी करायची नाही, मी पूर्ण तयारी केली आहे

ईडी अधिकाऱ्यांनी चांगली आणि सन्मानपूर्वक वागणूक दिली. अद्याप कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही. अटकेत असतानाही चौकशी होईल, याची शाश्वती नाही. कारण ईडीला चौकशी करायची नाही. ईडीला जे करायचे ते करू शकतात. मी पूर्ण तयारी केली आहे. जनतेला मला पाठिंबा आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना राऊज ॲव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले होते. अरविंद केजरीवाल यांनी ईडीचे अधिकारी कपिल राज आणि सत्यव्रत यांची हेरगिरी करणारा १५० पानांचा अहवाल त्यांच्या घरी सापडल्याचा आरोप ईडीने केला. हा केवळ शंभर कोटींचाच घोटाळा नसून लाच देणाऱ्यांनी कमावलेल्या नफ्यातून सहाशे कोटींचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे.
 

Web Title: delhi cm arvind kejriwal in ed custody and said not resigns from chief minister post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.