हीच ती वेळ! दिल्ली अध्यादेशाविरोधात पाठिंबा द्या; अरविंद केजरीवालांचे विरोधकांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 12:58 PM2023-06-21T12:58:27+5:302023-06-21T12:59:01+5:30

Arvind Kejriwal Letter To Oppostions: एक एक करून सर्व राज्यातून लोकशाही संपवली जाईल, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

delhi cm arvind kejriwal letter to opposition parties about to support delhi against central govt ordinance | हीच ती वेळ! दिल्ली अध्यादेशाविरोधात पाठिंबा द्या; अरविंद केजरीवालांचे विरोधकांना पत्र

हीच ती वेळ! दिल्ली अध्यादेशाविरोधात पाठिंबा द्या; अरविंद केजरीवालांचे विरोधकांना पत्र

googlenewsNext

Arvind Kejriwal Letter To Oppostions: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, बिहारची राजधानी पाटणा येथे देशातील विरोधी पक्षनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जात आहे. मात्र, यातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सर्व विरोधी पक्षांना एक पत्र लिहिले असून, दिल्ली संदर्भात केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या अध्यादेशाला विरोध करावा, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी पत्रात लिहिले आहे की, केंद्राने दिल्लीत अध्यादेश आणून एक प्रयोग केला आहे. तो प्रयोग यशस्वी झाल्यास, बिगरभाजपशासित राज्यांसाठी असाच अध्यादेश जारी करून राज्यांच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या सर्व अधिकार काढून टाकले जाईल. अशा परिस्थितीत सर्व पक्ष आणि सर्व जनतेने मिळून कोणत्याही परिस्थितीत तो अध्यादेश संसदेत मंजूर होऊ देऊ नये, असे विनंती अरविंद केजरीवाल यांनी केली. 

एक एक करून लोकशाही संपवली जाईल

जर हा अध्यादेश संसदेत मंजूर झाला तर दिल्लीतील जनतेने ज्या सरकारला निवडले त्या सरकारला कोणताही अधिकार राहणार नाही. नायब राज्यपालांच्या माध्यमातून केंद्र सरकार दिल्लीतही सरकार चालवेल. मग दिल्लीतील जनता कोणत्याही पक्षाला निवडून देता येणार नाही. त्यानंतर दिल्लीशिवाय इतर राज्यांतून एक एक करून लोकशाही संपवली जाईल, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी पत्रातून केली. तो दिवस दूर नाही जेव्हा पंतप्रधान ३३ राज्यपाल आणि नायब राज्यपालांच्या माध्यमातून सर्व राज्य सरकारे चालवतील. असा अध्यादेश आणून केंद्र सरकार कोणत्याही पूर्ण राज्याचे सर्व अधिकार काढून घेऊ शकते, असा दावा केजरीवाल यांनी केला. 

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी सर्व नेत्यांना आवाहन केले की, २३ तारखेला विरोधी पक्षनेत्यांची बैठक सुरू होईल तेव्हा या अध्यादेशावर सर्व पक्षांची भूमिका आणि संसदेत तो पारित न करण्याबाबतच्या रणनीतिवर आधी चर्चा करावी. पाटणा येथे विरोधी पक्षांच्या बैठकीत २० हून अधिक पक्षांचे नेते सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: delhi cm arvind kejriwal letter to opposition parties about to support delhi against central govt ordinance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.