दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बसणार आमरण उपोषणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 07:48 PM2019-02-23T19:48:37+5:302019-02-23T20:06:48+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी येत्या एक मार्चपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

delhi cm arvind kejriwal to sit on an indefinite fast from march 1 for full statehood of delhi | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बसणार आमरण उपोषणाला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बसणार आमरण उपोषणाला

Next

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी येत्या एक मार्चपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिल्ली विधानसभेत सांगितले की, मी एक मार्चपासून दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळण्यासाठी आमरण उपोषण करणार आहे. 

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळण्यासाठी आम्ही एक आंदोलन सुरु करत आहोत. एक मार्चपासून सुरु होणारे आमरण उपोषण दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळेपर्यंत सुरु राहणार आहे. दिल्लीतील लोकांनी आम्हाला भरपूर काही दिले आहे. त्यांच्यासाठी वेळ आली तर मृत्यूला सामोरा जायलाही तयार आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. 


दिल्ली सोडून संपूर्ण देशात लोकशाही आहे. दिल्लीतील लोक मत देऊन सरकार निवडतात पण सरकारला कोणतेही अधिकार नाहीत. त्यासाठी आम्ही एक मार्चपासून चळवळ चालू करणार आहोत. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळेपर्यंत मी आमरण उपोषणाला करणार आहे असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.



 

Web Title: delhi cm arvind kejriwal to sit on an indefinite fast from march 1 for full statehood of delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.