सीएम अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत, AAP'ने दिली प्रतिक्रिया म्हणाले, 'एजन्सीला दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना....;
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 10:12 AM2024-01-03T10:12:14+5:302024-01-03T10:13:20+5:30
दिल्ली मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडी समोर हजर राहणार नाहीत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा ईडीचे समन्स आले आहे, मद्य घोटाळा प्रकरमी ईडीने समन्स दिले आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री केजरीवाल ईडीसमोर हजर राहाणार नाहीत. केजरीवाल आपले उत्तर पाठवले आहे. यावर आता आम आदमी पक्षाकडूनही प्रतिक्रिया आली आहे. 'मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीच्या तपासात सहकार्य करण्यास तयार आहेत, पण तपास यंत्रणेची नोटीस बेकायदेशीर आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे.
आसाममध्ये भीषण अपघात! बस-ट्रकच्या धडकेत १४ जणांचा मृत्यू, पिकनिकला जाताना घडली घटना
"केजरीवाल यांना निवडणूक प्रचारापासून रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीपूर्वी नोटीस बजावण्यावरही 'आप'ने प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्ली मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ३ जानेवारीला हजर राहण्यासाठी तिसरी नोटीस बजावली होती. यापूर्वी दोनदा नोटीस मिळाल्यानंतरही ते ईडीसमोर हजर झाले नव्हते. आता केजरीवाल तिसऱ्यांदा ईडीसमोर हजर झाले नाहीत. यापूर्वीही अरविंद केजरीवाल यांनी ईडीने पाठवलेल्या दोन समन्सबाबत लेखी उत्तर पाठवून प्रश्न उपस्थित केले होते. समन्स बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत त्यांनी चौकशीत भाग घेतला नाही.
यापूर्वी, ईडीने केजरीवाल यांना २ नोव्हेंबर आणि २१ डिसेंबर २०२३ रोजी हजर राहण्यासाठी समन्स पाठवले होते. मात्र तो तपास यंत्रणेसमोर हजर झाले नाहीत. दिल्लीतील आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना दुसरे समन्स पाठवण्यात आले तेव्हा ते विपश्यना ध्यानासाठी पंजाबला गेले होते.
तिसऱ्या समन्सवरही दिल्लीचे मुख्यमंत्री हजर झाले नाहीत तर ते अडचणीत येऊ शकतात. वरिष्ठ वकील गीता लुथरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रक्रिया अशी आहे की ईडीच्या समन्सवर हजर न झाल्यास जामीनपात्र वॉरंट जारी केले जाते आणि त्यानंतरही हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी केले जाते. त्यानंतरही व्यक्ती हजर न झाल्यास अटक करण्याची तरतूद आहे.