"दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या UPSC विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये देणार", विकास दिव्यकीर्तींची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 01:33 PM2024-08-02T13:33:30+5:302024-08-02T13:43:48+5:30
Delhi coaching centre deaths: विकास दिव्यकीर्ती यांनी राऊ आयएएस स्टडी सर्कल सेंटर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवासांपूर्वी दिल्लीतील जुने राजेंद्र नगर येथील राऊ आयएएस स्टडी सर्कल कोचिंगच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्यामुळे तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर दृष्टी आयएएसचे मालक विकास दिव्यकीर्ती यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.
विकास दिव्यकीर्ती यांनी राऊ आयएएस स्टडी सर्कल सेंटर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच, दुर्घटना झालेल्या राऊ आयएएस स्टडी सर्कल सेंटरमधील इतर विद्यार्थ्यांनाही मोफत क्लास देण्याची घोषणा केली आहे. तत्पूर्वी, विकास दिव्यकीर्ती यांनी या घटनेबाबत उशिरा भाष्य केल्याबद्दल विद्यार्थ्यांची माफी मागितली होती.
दृष्टी आयएएसच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे विकास दिव्यकीर्ती यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत जुन्या राजेंद्र नगर येथे झालेल्या दोन अपघातात ४ होतकरू विद्यार्थ्यांचा अकाली मृत्यू झाला. नीलेश राय या एका विद्यार्थ्याचा पाण्यामुळं रस्त्यावर विजेचा धक्का लागून मृत्यू झाला, तर श्रेया यादव, तान्या सोनी आणि निविन डॅल्विन या तीन विद्यार्थ्यांचा कोचिंग इन्स्टिट्यूटच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्यामुळे मृत्यू झाला. चारही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर ही अत्यंत दुःखाची वेळ आहे.
या कठीण काळात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्हाला माहित आहे की, कितीही पैसा मुलं नाहीत, हे दुःख मिटवू शकत नाही, तरीही या दुःखाच्या वेळी आमची भागीदारी व्यक्त करण्याच्या प्रयत्नात दृष्टी आयएएसने चारही कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतरही या कुटुंबांना अन्य काही मदत करता आली तर आम्ही करू, असे विकास दिव्यकीर्ती यांनी सांगितले.
याव्यतिरिक्त, विकास दिव्यकीर्ती म्हणाले की, आम्ही राऊ आयएएसच्या सर्व सध्याच्या विद्यार्थ्यांना कोचिंगसह मदत करण्यास तयार आहोत. आम्ही सामान्य अध्ययन, टेस्ट सिरीज आणि वैकल्पिक विषयांच्या तयारीसाठी त्यांना विनामूल्य शैक्षणिक मदत आणि क्लासेस देऊ. या सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणारे विद्यार्थी ५ ऑगस्ट २०२४ पासून करोलबाग येथील आमच्या कार्यालयात असलेल्या हेल्प डेस्कशी संपर्क साधू शकतात.
प्रेस विज्ञप्ति
— Drishti IAS (@drishtiias) August 2, 2024
2 अगस्त, 2024
पिछले कुछ दिनों में ओल्ड राजेंद्र नगर में हुई दो दुर्घटनाओं में चार होनहार विद्यार्थियों का असमय निधन हुआ। एक विद्यार्थी नीलेश राय का निधन जलमग्न सड़क पर करेंट लगने से हुआ जबकि तीन विद्यार्थी श्रेया यादव, तान्या सोनी और निविन डाल्विन एक कोचिंग… pic.twitter.com/xKDsV3lAWO