मोराला तिरंग्याचा मान; पोलिसांनी शहीद जवानासारखे केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2018 02:39 PM2018-05-08T14:39:28+5:302018-05-08T14:52:22+5:30

शहीद जवानांना किंवा देशातील विशिष्ट मानाचे पदं भूषवलेल्या व्यक्तींना तिरंग्यात गुंडाळून त्यांना निरोप देण्याचा प्रोटोकॉल आहे.

delhi cops give tricolour burial to peacock, say it's protocol | मोराला तिरंग्याचा मान; पोलिसांनी शहीद जवानासारखे केले अंत्यसंस्कार

मोराला तिरंग्याचा मान; पोलिसांनी शहीद जवानासारखे केले अंत्यसंस्कार

Next

नवी दिल्ली : शहीद जवानांना किंवा देशातील विशिष्ट मानाचे पदं भूषवलेल्या व्यक्तींना तिरंग्यात गुंडाळून त्यांना निरोप देण्याचा प्रोटोकॉल आहे. पण राजधानी दिल्लीत एका मोराला तिरंग्यात गुंडाळून अंतिम निरोप देण्यात आला. दिल्ली पोलिसांच्या या कृत्यामुळं नवा वाद उपस्थित झाला आहे.
मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्यामुळे तिरंग्यात गुंडाळून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले असल्याचे स्पष्टिकरण दिल्ली पोलिसांनी दिले आहे. मोराला सन्मानाने अंतिम निरोप देणं हा प्रोटोकॉल असून भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती उद्भवली, तरी आपण हेच करु असेही दिल्लीतील टिळक मार्ग पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या गेटवर जखमी अवस्थेत आढळला होता. जखमी अवस्थेतील मोराला पोलिसांनी चांदनी चौकातील प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान मोराचा मृत्यू झाला. त्यानंतर मोराचा मृतदेह जौनपूरमधील रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करण्यात आलं. वनअधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच पोलिसांनी मोराला एका लाकडी पेटीत बंद केलं. पेटीभोवती तिरंगा गुंडाळून त्याचं दफन केलं. या सर्व प्रकारामुलं नवा वाद तयार झाला आहे.  

मोर हा शेड्यूल -I पक्षी असल्यामुळे पोलिसांनी वन्यजीव कायद्याचं उल्लंघन केलं असल्याचं वन्यजीव कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. कायद्यानुसार शेड्यूल -I वर्गातील पक्षी राज्याची संपत्ती असते. त्याचा मृतदेह आढळल्यास त्याच्या शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्याचा हक्क फक्त राज्य वनविभागाकडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Web Title: delhi cops give tricolour burial to peacock, say it's protocol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस