'आप'चे आमदार सोमनाथ भारती यांना कोर्टाचा दिलासा, गुन्हा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 03:00 PM2019-05-07T15:00:34+5:302019-05-07T15:01:50+5:30
सोमनाथ भारती यांना दिल्ली कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे.
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे (आप) आमदार सोमनाथ भारती यांना दिल्ली कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. दिल्ली हायकोर्टाने सोमनाथ भारती यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी दाखल केलेला गुन्हा केला आहे.
सोमनाथ भारती यांच्या पत्नीने त्यांच्यावर फसवणूक, धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप केला होता. मात्र, सध्या सोमनाथ भारती आणि त्यांची पत्नी लिपिका मित्रा सोबत राहत आहेत. याची दखल घेत दिल्ली कोर्टाने सोमनाथ भारती यांच्यावरील दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द केला आहे.
A Delhi Court quashes the FIR against AAP MLA Somnath Bharti in a domestic violence case filed against him by his wife Lipika Mitra. (File pic) pic.twitter.com/Zjks9bssj8
— ANI (@ANI) May 7, 2019
दरम्यान, लिपिका मित्रा यांनी 10 जून 2015 रोजी दिल्ली महिला आयोगाकडे सोमनाथ भारती यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. 2010 मध्ये लग्न झाल्यापासूनच पतीकडून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी सोमनाथ भारती यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.