व्हिसा नियमांचे उल्लंघन; 1,890 परदेशी नागरिकांविरोधात लुकआऊट नोटीस, दिल्ली पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 01:57 PM2020-04-15T13:57:55+5:302020-04-15T14:33:17+5:30

परदेशातून आलेल्या तब्बल 1890 जमाती मंडळींवर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच परदेशातून आलेल्या जमातमधील इतर लोकांचीही भूमिका तपासण्यात येत आहे.

Delhi crime branch issued lookout notice against 1900 jamaat people | व्हिसा नियमांचे उल्लंघन; 1,890 परदेशी नागरिकांविरोधात लुकआऊट नोटीस, दिल्ली पोलिसांची कारवाई

व्हिसा नियमांचे उल्लंघन; 1,890 परदेशी नागरिकांविरोधात लुकआऊट नोटीस, दिल्ली पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्देपरदेशातून आलेले जमातचे लोक व्हिसा नियमांचे उल्लंघन करून धार्मिक कार्यात सहभागी झाले होतेपरदेशातून आलेल्या जमातमधील इतर लोकांचीही भूमिका तपासण्यात येत आहेजे तबलिगी टूरिस्ट व्हिसा घेऊन भारतात आले आणि तबलिगी जमातमध्ये सहभागी झाले, असे 960 परदेशी नागरिका ब्लॅक लिस्ट

नवी दिल्ली : निजामुद्दीन येथील मरकजमधून निघाल्यानंतर फरार झालेल्या तबलिगी जमातच्या नागरिकांविरोधात आता दिल्लीपोलिसांच्या गुन्हे शाखेने लुकआऊट नोटीस जारी केली आहे. परदेशातून आलेल्या तब्बल 1890 जमाती मंडळींवर ही कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून आलेले जमातचे लोक व्हिसा नियमांचे उल्लंघन करून धार्मिक कार्यात सहभागी झाले होते. ते सापडल्यानंतर त्यांचा व्हिसा रद्द करण्यात येत आहेत. तसेच परदेशातून आलेल्या जमातमधील इतर लोकांचीही भूमिका तपासण्यात येत आहे.

दिल्ली पोलिसांचे गुन्हे शाखा पथक लोकेशनच्या आधारे छापेमारी करत आहे. एवढेच नाही, तर तबलिगी जमातच्या 18 जणांना तपासात सहभागी होण्यासाठीही नोटीस बजावण्यात आली आहे. यापैकी 11 जण क्वारंटाईन आहेत.
 
जे तबलिगी टूरिस्ट व्हिसा घेऊन भारतात आले आणि तबलिगी जमातमध्ये सहभागी झाले होते, अशा तब्बल 960 परदेशी नागरिकांना  केंद्र सरकारने ब्लॅकलिस्ट केले आहे. तसेच  सर्व राज्यसरकारांनाही, अशा मंडळींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

'...तर त्यांचा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही' -
तबलिगी जमातीचे जे लोक दिल्लीच्या मरकजहून परतले त्यांच्यापैकी महाराष्ट्रात परतलेल्या १,३५५ जणांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यापैकी १३०० जणांच्या आवश्यक चाचण्या करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत वा त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जे लोक स्वत:हून हजर होणार नाहीत, त्यांचा आम्ही शोध घेतल्याशिवाय राहणार नाही, असे गृहमंत्री आनिल देशमुख यांनी गेल्या आठवड्यात लोकमतशी बोलताना म्हटले होते.

Web Title: Delhi crime branch issued lookout notice against 1900 jamaat people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.