धक्कादायक! राहत्या घरात वृद्ध दाम्पत्याची हत्या, शेजारी राहणाऱ्या मुलाला कळलंही नाही, दोन दिवस मृतदेह होते पडून, नोकर फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:21 IST2025-03-18T15:20:13+5:302025-03-18T15:21:31+5:30

Delhi Crime News: घरात एकटे राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना दिल्लीतील पीतमपुरा परिसरातील कोहाल एन्क्लेव्ह येथे घडली आहे.

Delhi Crime News: Shocking! Elderly couple murdered in their home, neighbor's son didn't even know, body was lying there for two days, servant absconding | धक्कादायक! राहत्या घरात वृद्ध दाम्पत्याची हत्या, शेजारी राहणाऱ्या मुलाला कळलंही नाही, दोन दिवस मृतदेह होते पडून, नोकर फरार

धक्कादायक! राहत्या घरात वृद्ध दाम्पत्याची हत्या, शेजारी राहणाऱ्या मुलाला कळलंही नाही, दोन दिवस मृतदेह होते पडून, नोकर फरार

घरात एकटे राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना दिल्लीतील पीतमपुरा परिसरातील कोहाल एन्क्लेव्ह येथे घडली आहे. वृद्ध पती-पत्नीचे मृतदेह राहत्या घरात सापडले असून, दोन दिवसांपूर्वी त्यांची हत्या करण्यात आली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या वृद्ध दाम्पत्याचा मुलगा शेजारीत घरात राहतो. मात्र त्यालाही या हत्येबाबत काहीच कळलं नाही. दरम्यान, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. वृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्यापासून घरातील नोकर बेपत्ता आहे. त्यामुळे पोलिसांना हत्येबाबत त्याच्यावरही प्राथमिक संशय आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ७० वर्षीय मोहिंदर सिंह हे त्यांच्या पत्नीसह कोहाट एन्क्लेव्हमधील आपल्या घरात राहायचे. मंगळवारी दोघांचेही मृतदेह घरामध्ये सापडले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासालला सुरुवात केली. पोलिसांनी सांगितले की, पीतमपुरा परिसरातील कोहाट एनक्लेव्ह येथे वृद्ध दाम्पत्याच्या हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. या घरामध्ये वृद्ध दाम्पत्य एकटं राहायचं. त्यांच्याकडे घरकामासाठी एक नोकर होता. मात्र दाम्पत्याची हत्या झाल्यापासून तो फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून, लवकरच त्याला बेड्या ठोकण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, वृद्ध दाम्पत्याचा मुलगा हा शेजारच्या घरात राहतो. त्यालाही आई-वडिलांच्या झालेल्या हत्येबाबत सुरुवातीला माहिती नव्हती, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्याच्याकडेही पोलीस चौकशी करत असून, चौकशीमधून समोर येणाऱ्या माहितीवरून या वृद्ध दाम्पत्याची हत्या कुणी केली असवी आणि का केली असावी, याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Delhi Crime News: Shocking! Elderly couple murdered in their home, neighbor's son didn't even know, body was lying there for two days, servant absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.