दिल्ली-देहरादून शताब्दी एक्स्प्रेसच्या कोचला भीषण आग; सर्व प्रवासी सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 03:02 PM2021-03-13T15:02:54+5:302021-03-13T15:05:42+5:30
Delhi Dehradun Shatabdi Express fire : कोणत्या कारणामुळे आग लागली याचा तपास सुरू
नवी दिल्ली-देहरादून शताब्दी ट्रेनच्या एका कोचला आज भीषण आग लागली. आग लागल्याचा प्रकार लक्षात येताच त्वरीत ट्रेन थांबवण्यात आली आणि हा कोच ट्रेनपासून वेगळी करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणताही प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. आगीची माहिती मिळताच एडीआरएन एन.एन. सिंह आणि अन्य रेल्वेचे अधिकारी त्वरित घटनास्थळी पोगोचले.
नवी दिल्ली-देहरादून शताब्दी एक्स्प्रेसच्या सी ४ या कोचला आग लागली. लोकोपायलटनं त्वरित समयसूचकता दाखलत तात्काळ ब्रेक लावत गाडी थांबवली. त्यानंतर तो कोच रिकामी करण्यात आली. तसंच हा कोच वेगळी करत आग पसरवण्यापासून थांबवण्यात आलं. या कोचमध्ये प्रवास करणारे सर्व प्रवासी सुरक्षित आहे. तसंच त्यांना अन्य कोचमध्ये हवण्यात आलं. यानंतर ट्रेन पुन्हा देहरादूनसाठी रवाना करण्यात आलं. घटनेचं गांभीर्य पाहता देहरादून रेल्वे स्थानकावर अॅम्ब्युलन्सही पाठवण्यात आल्या आहे.
A fire broke out in the C4 compartment of the Delhi-Dehradun Shatabdi Express today, due to a short circuit. The incident happened near Kansro. All passengers were safely evacuated, no injuries reported: Uttarakhand DGP Ashok Kumar pic.twitter.com/iTIwSkxCWS
— ANI (@ANI) March 13, 2021
या कोचमध्ये जवळपास ३० प्रवासी प्रवास करत होते. शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. तसंच ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. राजाजी टायगर रिझर्व्ह फॉरेस्ट दरम्यान ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. या ठिकाणी वन विभागाची चौकीदेखील होती. दरम्यान, या घटनेचा आता पुढील तपास केला जात असून कोणत्या कारणामुळे ही आग लागली याची माहिती घेतली जात आहे.