दिल्लीतून दहा वर्षे जुनी डिझेलवरील वाहने हटवा, एनजीटीचे दिल्ली सरकारला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:16 AM2017-11-15T00:16:33+5:302017-11-15T00:17:06+5:30

दिल्ली सरकारच्या सम-विषम योजनेतून महिला आणि दुचाकी वाहनांना बाहेर ठेवण्याची दिल्ली सरकारची मागणी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) मंगळवारी फेटाळून लावल्यानंतर दिल्ली सरकारने संबंधित याचिका मागे घेतली.

The Delhi-Delhi directive to remove 10-year-old diesel vehicles from Delhi, NGT | दिल्लीतून दहा वर्षे जुनी डिझेलवरील वाहने हटवा, एनजीटीचे दिल्ली सरकारला निर्देश

दिल्लीतून दहा वर्षे जुनी डिझेलवरील वाहने हटवा, एनजीटीचे दिल्ली सरकारला निर्देश

Next

नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या सम-विषम योजनेतून महिला आणि दुचाकी वाहनांना बाहेर ठेवण्याची दिल्ली सरकारची मागणी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) मंगळवारी फेटाळून लावल्यानंतर दिल्ली सरकारने संबंधित याचिका मागे घेतली. मात्र १० वर्षे जुनी डिझेल वाहने रस्त्यांवरून तत्काळ हटविण्याचे आदेशही एनजीटीने दिले.
दिल्लीतील सर्वाधिक प्रदूषित भाग निश्चित करून, तिथे पाण्याची फवारणी करा असे निर्देशही एनजीटीने दिले आहेत. प्रदूषण न करणाºया व आवश्यक वस्तूंची निर्मिती करणाºया कंपन्यांना काम करण्यास परवानगी दिली आहे. एनजीटीने ११ नोव्हेंबरच्या आदेशात सम-विषम योजनेतून महिला आणि दुचाकी वाहनांना सूट देण्यास नकार दिला होता. दिल्ली सरकारने या निर्णयावर पुनर्विचार करण्याच्या मागणीसाठी धाव घेतली होती. हरित लवादाने दिल्ली सरकारला विचारले की, महिलांसाठी स्वतंत्र बस का चालविण्यात येत नाही?
दुचाकींमुळे प्रदूषण-
एका अहवालाचा हवाला देत हरित लवादाने स्पष्ट केले की, दुचाकी वाहनातून होणारे प्रदूषण हे चारचाकी वाहनातून होणाºया प्रदूषणापेक्षा अधिक आहे, मग आपण अशी मनमानी सूट कशी देऊ शकता.

Web Title: The Delhi-Delhi directive to remove 10-year-old diesel vehicles from Delhi, NGT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.