दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांचा मासस्टर स्ट्रोक, आता भाडेकरूंसाठीही केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 14:27 IST2025-01-18T14:26:31+5:302025-01-18T14:27:31+5:30

Delhi Election 2025: यासंदर्भात बोलताना केजरीवाल म्हणाले, "दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही एक अशी योजना आणू ज्यामुळे दिल्लीत बाड्याने राहणाऱ्यांनाही मोफत वीज आणि पाण्याची सुविधा मिळेल.

Delhi Election 2025 Arvind Kejriwal's master stroke before Delhi Assembly elections, now big announcement made for tenants too | दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांचा मासस्टर स्ट्रोक, आता भाडेकरूंसाठीही केली मोठी घोषणा

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांचा मासस्टर स्ट्रोक, आता भाडेकरूंसाठीही केली मोठी घोषणा

Delhi Vidhan Sabha Chunav 2025: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी (१८ जानेवारी २०२५) आणखी एक मोठी घोषणा केली आहे. "आपण दिल्लीत वीज आणि पाणी मोफत देत आहोत. मात्र, भाडेकरूंना याचा लाभ मिळत नाही. याची अनेक कारणे असू शकतात. पण मला वाटते की, भाडेकरूंनाही याचा फायदा मिळाला हवा.

यासंदर्भात बोलताना केजरीवाल म्हणाले, "दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही एक अशी योजना आणू ज्यामुळे दिल्लीत बाड्याने राहणाऱ्यांनाही मोफत वीज आणि पाण्याची सुविधा मिळेल.

'भाडेकरूंना मिळणार फ्री वीज-पाणी योजनेचा लाभ"  -
मोफत वीज आणि पाण्यासंदर्भात बोलताना केजरीवाल म्हणाले, दिल्लीकरांना २०० युनिट्सपर्यंत मोफत वीज मिळते. २०० ते ४०० युनिट्सपर्यंत अर्धेच शुल्क आकारले जाते. दिल्लीत राहणाऱ्या भाडेकरूंना विविध कारणांमुळे त्याचे फायदे मिळत नाहीत. आता आमच्या सरकारने निर्णय घेतला आहे की जर भाडेकरू देखील दिल्लीचे रहिवासी असतील तर त्यांनाही मोफत वीज आणि पाणी मिळायला हवे. हे लक्षात घेऊन, आमच्या सरकारने अशी योजना आखली आहे की निवडणुकीनंतर आमचे सरकार भाडेकरूंनाही मोफत वीज आणि पाणी देईल.

आप प्रमुख केजरीवाल म्हणाले, "बहुतेक भाडेकरू बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातून येतात. ते दिल्लीत गरिबीत राहतात. एका इमारतीत १०० लोक राहतात. एवढ्या गरिबीतही त्यांना वीज आणि पाणी सब्सिडीचा लाभ मिळत नाही. यामुळे त्रास होतो.  आता सर्व भाडेकरूंनाही हा लाभ मिळेल."

Web Title: Delhi Election 2025 Arvind Kejriwal's master stroke before Delhi Assembly elections, now big announcement made for tenants too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.