महाराष्ट्र-हरयाणामध्ये भाजपने षड्यंत्र रचून विजय मिळवला? अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 02:59 PM2024-12-04T14:59:14+5:302024-12-04T14:59:48+5:30

Delhi Election 2025: दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल भाजपवर सातत्याने टीका करत आहेत.

Delhi Election 2025: Did BJP win in Maharashtra-Haryana by conspiring? Arvind Kejriwal's big claim | महाराष्ट्र-हरयाणामध्ये भाजपने षड्यंत्र रचून विजय मिळवला? अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

महाराष्ट्र-हरयाणामध्ये भाजपने षड्यंत्र रचून विजय मिळवला? अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत, राजधानीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे आपआपली सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहे, तर भाजप दिल्लीची सत्ता काबीज करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे. निवडणूक जवळ आल्यामुळे आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. अशातच, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक यांनी भाजपवर टीका करताना मोठा दावा केला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसंदर्भात पोस्ट करताना केजरीवालांनी महाराष्ट्र आणि हरयाणा निवडणुकीचाही मुद्दा उपस्थित केला. केजरीवाल X वरील पोस्टमध्ये म्हणतात, "दिल्लीमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणावर लोकांची मते कापण्याचा प्रयत्न करताना रंगेहाथ पकडले  आहे. हजारो मतदारांची मते कापण्यासाठी भाजपने अर्ज दाखल केला आहे. लवकरच यावर मोठा खुलासा करणार आहे. या लोकांनी हरयाणा आणि महाराष्ट्राची निवडऊक अशीच जिंकली का? भाजपवालो मी तुमचा डाव दिल्लीत यशस्वी होऊ देणार नाही," अशी पोस्ट केजरीवालांनी केली.

दिल्लीची निवडणूक महत्वाची
अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी स्थापन केल्यापासून सातत्याने दिल्लीत विजय मिळवत आहेत. 2020 च्या विधानसभा निवडणुकीतही अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने विधानसभेच्या 63 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला केवळ 7 जागांवर यश मिळवता आला होता. धक्कादायक बाब म्हणजे, काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र, त्यानंतर गेल्या पाच वर्षात अरविंद केजरीवालांसह पक्षातील काही नेत्यांवर मद्य घोटाळ्यासह इतर आरोप झाले आहेत. केजरीवालांसह अनेक नेत्यांना तुरुंगातही जावे लागली आहे. त्यामुळेच आता यंदाही निवडणूक खूप महत्वाची असणार आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये भाजपचा अनपेक्षित विजय
अरविंद केजरीवाल यांच्या या पोस्टनंतर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने अनपेक्षित विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या नेतृत्वाखाली भाजपने काँग्रेसच्या बाजूने वातावरण असतानाही, मोठा विजय मिळवला. तसेच, महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या बाजूने असलेला मतप्रवाह आपल्याकडे आणण्यात यशस्वी झाले. 
 

Web Title: Delhi Election 2025: Did BJP win in Maharashtra-Haryana by conspiring? Arvind Kejriwal's big claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.