प्रचारादरम्यान महिलेला दिला फ्लाईंग किस, आपच्या आमदाराविरोधात एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 07:51 IST2025-02-05T07:50:45+5:302025-02-05T07:51:12+5:30
Delhi Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र तत्पूर्वी आम आदमी पक्षाचे आणखी एक आमदार अडचणीत सापडले आहेत. आम आदमी पक्षाचे आमदार दिनेश मोहनिया यांच्यांविरोधात महिलेची छेड काढल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

प्रचारादरम्यान महिलेला दिला फ्लाईंग किस, आपच्या आमदाराविरोधात एफआयआर दाखल
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र तत्पूर्वी आम आदमी पक्षाचे आणखी एक आमदार अडचणीत सापडले आहेत. आम आदमी पक्षाचे आमदार दिनेश मोहनिया यांच्यांविरोधात महिलेची छेड काढल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आली आहे. दिनेश मोहनिया यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका महिलेला फ्लाईंग किस दिला होता. याप्रकरणी व्हिडिओ चित्रिकरणाच्या आधारावर आणि महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी मोहनिया यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र याबाबत दिनेश मोहनिया यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
दिल्लीमधील संगम विहार मतदारसंघातून दिनेश मोहनिया हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून दिनेश मोहनिया यांनी सलग तीन वेळा विजय मिळवलेला आहे. तसेच पक्षाने त्यांना चौथ्यांदा इथून उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर भाजपाचे चंदन कुमार चौधरी आणि काँग्रेसचे हर्ष चौधरी यांचं आव्हान आहे. मात्र मतदानापूर्वीच दिनेश मोहनिया यांच्यावर एका महिलेची छेड काढल्याचा आरोप झाला आहे.
दिनेश मोहनिया हे याआधीही महिलांच्या एका गटासोबत गैरवर्तन केल्याने वादात सापडले होते. २३ जून २०१६ रोजी महिलांच्या एका समुहासोबच कथितपणे गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. आपल्या परिसरातील पाण्याच्या समस्येबाबत तक्रार घेऊन आलेल्या महिलांसोबत दिनेश मोहनिया यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच या प्रकरणी त्यांच्यावर अटकेची कारवाईही झाली होती. मात्र पुढे २०२० मध्ये दिनेश मोहनिया यांना या प्रकरणातून मुक्त करण्यात आलं होतं.