कोणत्या निवडणुकीत पहिल्यांदा एक्झिट पोलचा वापर झाला? काय आले होते निकाल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 21:39 IST2025-02-06T21:38:18+5:302025-02-06T21:39:28+5:30

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एक्झिट पोलची चर्चा सुरू झाली आहे.

Delhi Election 2025: In which election was exit polls used for the first time? What were the results? Know... | कोणत्या निवडणुकीत पहिल्यांदा एक्झिट पोलचा वापर झाला? काय आले होते निकाल? जाणून घ्या...

कोणत्या निवडणुकीत पहिल्यांदा एक्झिट पोलचा वापर झाला? काय आले होते निकाल? जाणून घ्या...

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुका संपल्यापासून एक्झिट पोलची चर्चा सुरू झाली आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्ष दिल्लीत सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, एक्झिट पोल म्हणजे काय? याची सुरुवात कधी आणि कुठे झाले? आज आम्ही तुम्हाला याच एक्झिट पोलबद्दल सांगणार आहोत. 

एक्झिट पोल म्हणजे काय? तर, एक्झिट पोल हे एक सर्वेक्षण आहे, जे मतदानाच्या दिवशी जाहीर केले जाते. या सर्वेक्षणादरम्यान मतदानासाठी बाहेर पडणाऱ्या मतदारांना विचारले जाते की, त्यांनी कोणाला मतदान केले आहे. अशा प्रकारे, कंपन्या डेटाचे विश्लेषण करून कोणाचे सरकार बनवले जात आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. याला एक्झिट पोल म्हणतात.

एक्झिट पोल या देशात पहिल्यांदा सुरू झाला?
आज भारताशिवाय असे अनेक देशात निवडणुकीपूर्वी आणि नंतर एक्झिट पोल दाखवले जातात. पण तुम्हाला माहित आहे का, एक्झिट पोल कोणत्या देशात सर्वात आधी दाखवला गेला? 1936 मध्ये अमेरिकेत पहिला एक्झिट पोल घेण्यात आला होता. त्यावेळी जॉर्ज गॅलप आणि क्लॉड रॉबिन्सन यांनी न्यूयॉर्कमध्ये सर्वेक्षण केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी मतदान केंद्रांमधून बाहेर पडणाऱ्या मतदारांना विचारण्यात आले की, त्यांनी अध्यक्षपदासाठी कोणत्या उमेदवाराला मतदान केले आहे. त्या एक्झिट पोलमध्ये फ्रँकलिन डी. रुझवेल्ट विजयी होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता, जो निवडणूक निकालात खरा ठरला. यानंतर, एक्झिट पोलचा ट्रेंड जगभरात वेगाने पसरला. माहितीनुसार, यानंतर ब्रिटनमध्ये 1937 मध्ये आणि फ्रान्समध्ये 1938 मध्ये पहिले एक्झिट पोल घेण्यात आले.

भारतातील पहिला एक्झिट पोल कधी घेतला?
भारतात पहिला एक्झिट पोल कधी आला? 1957 मध्ये दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतात पहिल्यांदाच एक्झिट पोल घेण्यात आला होता. त्यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनने हे सर्वेक्षण केले होते. पण, त्याला पूर्णपणे एक्झिट पोल म्हटले गेले नाही. यानंतर 1980 मध्ये डॉ. प्रणय रॉय यांनी पहिला एक्झिट पोल काढला. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलची बरीच चर्चा झाली होती. कारण त्यावेळी दूरदर्शनवर एक्झिट पोल दाखवण्यात आले होते.

सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजने हे सर्वेक्षण केले आहे. त्या निवडणुकीत एक्झिट पोलने मताधिक्य तुटण्याची शक्यता वर्तवली होती. पुढेही असाच प्रकार घडला. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता, पण बहुमतापासून दूर होता. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले, पण बहुमत नसल्यामुळे त्यांना 13 दिवसांत राजीनामा द्यावा लागला.
 

Web Title: Delhi Election 2025: In which election was exit polls used for the first time? What were the results? Know...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.