'अरविंद केजरीवाल स्वतःवर गोळी झाडण्याची शक्यता...', मनोज तिवारींची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 16:44 IST2024-12-01T16:44:09+5:302024-12-01T16:44:38+5:30

Delhi Politics: भाजप खासदार मनोज तिवारी यांनी अरविंद केजरीवालांबाबत मोठा दावा केला आहे.

Delhi Election Arvind Kejriwal : 'Arvind Kejriwal is likely to shoot himself', says Manoj Tiwari | 'अरविंद केजरीवाल स्वतःवर गोळी झाडण्याची शक्यता...', मनोज तिवारींची बोचरी टीका

'अरविंद केजरीवाल स्वतःवर गोळी झाडण्याची शक्यता...', मनोज तिवारींची बोचरी टीका


Arvind Kejriwal News: दिल्ली विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येवून ठेपली आहे. त्यामुळे भाजप आणि आम आदमी पार्टीने प्रचार सुरू केला असून, नेते सातत्याने एकमेकांवर टीका करत आहेत. अशातच, भाजप खासदार मनोज तिवारी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. 'अरविंद केजरीवाल स्वतःवरही गोळ्या झाडून घेऊ शकतात. ते जे बोलतात, ते करत नाही, म्हणून ते जे बोलतात, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. यावेळी दिल्लीवकर त्यांना नक्की निरोप देतील आणि भारतीय जनता पक्षालाच निवडतील,' असा विश्वास मनोज तिवारींनी व्यक्त केला.

मनोज तिवारी पुढे म्हणतात, 'अरविंद केजरीवाल विविध डावपेच अवलंबतात. काल त्यांनी स्वतःवर मिनरल वॉटर शिंपडून घेतले. मी तर म्हणेन की, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने देखील सावधगिरी बाळगली पाहिजे. ते स्वतः त्यांच्या वाहनांवर गोळीबार करुन घेऊ शकतात. त्यांना लोकांचा गोंधळात टाकायचे आहे. त्यांच्याकडे आता कुठलेच मुद्दे उरले नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कट रचला जाऊ शकतो.'

आपचे नेते गुन्हेगारांचे मनोबल वाढवत आहेत
नरेश बल्यानच्या अटकेबाबत मनोज तिवारी म्हणाले, नरेश बल्यान खंडणीचे काम करायचा. त्याला सुपारी देणे, लोकांना त्रास देणे, टोळीयुद्धे उभारणे अशा गुन्ह्यांमध्ये अटक झाली आहे.  ज्या पक्षाचा नेता गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर भ्रष्टाचाराचा खटला प्रलंबित आहे तो पक्ष आपल्या भ्रष्ट नेत्यांना नक्कीच संरक्षण देईल. पण दिल्लीकरांना समजले आहे की, आम आदमी पक्षाचे नेते गुन्हेगारांचे मनोबल वाढवत आहेत, अशी टीकाही तिवारी यांनी यावेळी केली.

 

Web Title: Delhi Election Arvind Kejriwal : 'Arvind Kejriwal is likely to shoot himself', says Manoj Tiwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.