दिल्ली विधानसभा : 'शाहीन बागे'तही भाजपचा दारुण पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 03:18 PM2020-02-11T15:18:46+5:302020-02-11T15:19:58+5:30

ओखला मतदार संघातून आपचे अमानतुल्ला खान यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे ब्रह्म सिंह यांना पराभूत केले आहे. अमानतुल्ला यांना ब्रह्म सिंह यांच्यापेक्षा 25, 501 अधिक मते मिळाली आहेत. 

delhi election bjp lost shaheen bagh okhla seat | दिल्ली विधानसभा : 'शाहीन बागे'तही भाजपचा दारुण पराभव

दिल्ली विधानसभा : 'शाहीन बागे'तही भाजपचा दारुण पराभव

googlenewsNext

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीला स्पष्ट कौल दिला आहे. 'आप'ने 63 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 7 मतदारसंघांत पुढे आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा आपचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे. तर दिल्ली विधानसभेत सर्वात वादग्रस्त मुद्दा ठरलेल्या शाहीन बाग आंदोलनाचा भाजपला फटका बसला आहे. मात्र 'आप'ला फायदा झाला आहे. 

भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रचाराच शाहीन बाग येथील नागरिकता संशोधन कायदा आणि एनआरसी विरोधातील आंदोलन महत्त्वपूर्ण मुद्दा बनवला होता. या मुद्दावर भाजपने मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. शाहीन बाग आंदोलनाचा भाग हा ओखला मतदार संघात येत होता. त्यातच शाहीन बाग आंदोलनाकडे देशाचे लक्ष लागलेले होते. त्यामुळे सहाजिकच ओखला मतदार संघातील निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. या मतदार संघातून भाजपला 25 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. 

ओखला मतदार संघातून आपचे अमानतुल्ला खान यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे ब्रह्म सिंह यांना पराभूत केले आहे. अमानतुल्ला यांना ब्रह्म सिंह यांच्यापेक्षा 25, 501 अधिक मते मिळाली आहेत. 

2015 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपने 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवला होता.  त्यावेळी भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत आपला काही जागांचे नुकसान झाले आहे. तर भाजपचा आकडा 3 हून 9 पोहोचला आहे. 
 

Web Title: delhi election bjp lost shaheen bagh okhla seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.