Delhi Election : भाजपाला मोठा धक्का; शिवसेनेनंतर आणखी एका पक्षाने 21 वर्षांची साथ सोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 09:46 IST2020-01-21T08:30:51+5:302020-01-21T09:46:50+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. नागरिकता संशोधन कायद्यासाठी भाजपाने दबाव टाकला होता.

Delhi Election : भाजपाला मोठा धक्का; शिवसेनेनंतर आणखी एका पक्षाने 21 वर्षांची साथ सोडली
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. शिवसेनेनंतर भाजपासोबत सर्वाधिक काळ असलेल्या अकाली दलाने साथ सोडली असून २१ वर्षे जुनी युती तुटली आहे. शिरोमणि अकाली दलाने(शिअद बादल) निवडणुकीपूर्वी भाजपाशी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिकता संशोधन कायद्यासाठी अकाली दलावर भाजपाने दबाव टाकला होता. दिल्ली शिख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, सीएएवर भूमिका घेतल्याशिवाय आम्ही विधानसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये अकाली दल नेहमी भाजपासोबत निवडणूक लढवितो. जर आम्ही आवाज उठवू शकत नाही तर निवडणूक लढविण्यात काही अर्थ नाही.
कोणताही अकाली दलाचा नेता अपक्ष निवडणूक लढविणार नाही. केवळ निवडणूक न लढण्याचा निर्णय झाला आहे. युतीबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांना घ्यायचा असल्याचेही सिरसा यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांमध्ये राजकीय नाही तर सामाजिक युती आहे. पंजाबमध्ये शांती आणि भाऊबंध टिकविणारे ही युती आहे, असेही ते म्हणाले. मात्र, भाजपा उमेदवाराचा प्रचार करणार का, या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले.
Delhi Election: केजरीवालांविरोधात भाजपाने उभा केला उमेदवार; दुसरी यादी जाहीर
दिल्लीत भाजपाने निवडणूकपूर्व सर्व्हे केला; घबाडच सापडले पण...
Delhi opinion poll 2020 : दिल्ली आपचीच; केजरीवाल पुन्हा पडणार भाजपाला भारी
दिल्ली विधानसभा: आपने 15 आमदारांचे तिकीट कापले; 70 उमेदवारांची यादी एकाचवेळी जाहीर
सीएएची मागणी अकाली दलानेच केली होती. मात्र, त्यामध्ये कोणत्या एका धर्माला काढण्याचे कधीच म्हटले नव्हते. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये अत्याचार होत असलेले हिंदू, शीख, ख्रिश्चन आणि बौद्धांना भारताचे नागरीकत्व देण्याचे आम्ही स्वागत करतो. यामध्ये मुस्लिमांनाही सहभागी करण्यात यायला हवे, असेही सिरसा म्हणाले.