Delhi Election: निवडणुकीच्या तोंडावर लाच घेताना उपमुख्यमंत्र्यांच्या 'ओएसडी'ला अटक!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 08:06 AM2020-02-07T08:06:06+5:302020-02-07T08:38:52+5:30

गोपाल कृष्ण माधव हे 2015 पासून मनिष सिसोदिया यांच्या कार्यालयात काम करत आहेत.

Delhi Election: CBI arrests OSD to Delhi deputy CM Manish Sisodia on bribery charges | Delhi Election: निवडणुकीच्या तोंडावर लाच घेताना उपमुख्यमंत्र्यांच्या 'ओएसडी'ला अटक!

Delhi Election: निवडणुकीच्या तोंडावर लाच घेताना उपमुख्यमंत्र्यांच्या 'ओएसडी'ला अटक!

Next

नवी दिल्ली : दिल्लीतील मंत्रालयात लाच घेताना एका अधिकाऱ्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने रंगेहाथ पकडले. गोपाल कृष्ण माधव असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल कृष्ण माधव हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे ओएसडी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना टॅक्स प्रकरणासाठी दोन लाख रूपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.   

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री उशिरा गोपाल कृष्ण माधव यांना लाच घेताना अटक करण्यात आली. जीएसटी संबंधीतील एका प्रकरणात दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम घेताना गोपाल कृष्ण माधव यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर गोपाल कृष्ण माधव यांना लगेच सीबीआयच्या मुख्यालयात येण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार, याप्रकरणी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांची कोणतीच भूमिका अद्याप समोर आली नाही. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. गोपाल कृष्ण माधव हे 2015 पासून मनिष सिसोदिया यांच्या कार्यालयात काम करत आहेत. विशेष म्हणजे, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण आणखीनच तापणार असल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान, काल विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस भाजपा आणि काँग्रेसचा ‘रोड शो’, तर आम आदमी पार्टीच्या ‘झाडू चलाओ यात्रा’ने गाजला. शेवटच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, बॉलीवूड स्टार खासदार सनी देओल, तर काँग्रेससाठी अभिनेता तसेच खासदार राज बब्बर यांनी ‘रोड शो’ व पदयात्रा केल्या. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक करण्याची कुठलीही संधी सोडली नाही. आरोप-प्रत्यारोपांच्या या मालिकेत मतदारांना आकर्षित करण्यासाठीही सर्वच पक्षांनी आतोनात प्रयत्न केले. गुरुवारचा दिवस सर्व पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा साऱ्यांनीच प्रयत्न केला.

काऊंटडाऊन सुरू

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता संपला असून मतदानासाठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे.
शनिवारी (८ फेब्रुवारी) सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. जवळपास १ कोटी ४६ लाख मतदारांच्या हातात उमेदवारांचे भवितव्य आहे. यातील ८० लाख ५५ हजार पुरुष व ६६ लाख ३५ हजार महिला मतदार आहेत.७० मतदारसंघांमध्ये २६८८ मतदान केंद्रांची व्यवस्था आयोगाने केली आहे. यातील ५१६ मतदान केंद्रांना अतिसंवेदनशील श्रेणीत ठेवण्यात आले आहे. ११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

अमित शहांनी ठिकाण-वेळ ठरवावी, मी चर्चेला तयार : केजरीवाल

भाजप-काँग्रेसचे ‘रोड शो’, आपची ‘झाडू यात्रा’; अमित शहा, राज बब्बर यांनी गाजवला दिवस

सच्चा हिंदू मैदान सोडून पळत नाही; केजरीवालांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल

Web Title: Delhi Election: CBI arrests OSD to Delhi deputy CM Manish Sisodia on bribery charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.