Delhi Election: भाजपाच्या 57 उमेदवारांची यादी जाहीर; आपच्या मंत्र्याला तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 09:56 PM2020-01-17T21:56:14+5:302020-01-17T22:56:53+5:30
मतदारांची पहिली पसंती असलेल्या आम आदमी पक्षाने पहिल्याच फटक्यात सर्वच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
नवी दिल्ली : नवी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. यामुळे मतदारांची पहिली पसंती असलेल्या आम आदमी पक्षाने पहिल्याच फटक्यात सर्वच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर प्रमुख विरोधक असलेल्या भाजपाने आज 57 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये केजरीवालांच्या मंत्रिमंडळात असलेल्या एका मंत्र्यालाही तिकीट देण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता दिल्लीतील जनतेचा संभाव्य कल सांगणारे ओपिनियन पोल प्रसिद्ध झाले. एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने आज प्रसिद्ध केलेल्या ओपिनियन पोलमधून दिल्लीमध्ये आपचीची सत्ता कायम राहणार असल्याचा कल दर्शवला आहे. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष पुन्हा एकदा मोठ्या बहुमतासह विजयी होणार असून, भाजपा आणि काँग्रेसला दोन आकडी जागाही जिंकता येणार नाहीत, असा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. तर भाजपाने केलेल्या सर्व्हेमध्ये केजरीवाल जरी पंसती असले तरीही मतदार आमदारांवर नाराज असल्याचे पुढे आले होते.
आपने 15 विद्यमान आमदारांना नारळ दिला आहे. तर 9 रिक्त जागांवर नवीन उमेदवार देण्यात आले आहेत. गेल्या वेळी आपने 6 महिलांना उमेदवारी दिली होती. यंदाच्या यादीमध्ये 8 महिलांना संधी दिली आहे.
दिल्ली विधानसभा: आपने 15 आमदारांचे तिकीट कापले; 70 उमेदवारांची यादी एकाचवेळी जाहीर
उमेदवारी देण्यासाठी 10 कोटी मागितले; आपच्या आमदाराचा आरोप
Delhi opinion poll 2020 : दिल्ली आपचीच; केजरीवाल पुन्हा पडणार भाजपाला भारी
यामुळे भाजपाने आज पहिली यादी जाहीर केली आहे. तसेच उर्वरित 13 जागांवर लवकरच उमेदवार जाहीर केले जातील असेही म्हटले आहे. यामध्ये चार महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. आपमध्ये मंत्री राहिलेल्या कपिल शर्मा यांना मॉडल टाऊनमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दिल्ली भाजपाचे माजी अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांना रोहिणी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. ते याच जागेवरून आमदार आहेत.
मात्र, या यादीमध्ये अद्याप केजरीवालांविरोधात उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. भाजपाने जननायक जनता दलासाठी 13 जागा सोडल्याचे समजते. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.