Delhi Election Result 2020 : निकालापूर्वीच भाजपानं स्वीकारला पराभव?, कार्यालयात लागले पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 08:54 AM2020-02-11T08:54:30+5:302020-02-11T08:57:58+5:30
Delhi Election Result 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. याचदरम्यान भाजपाच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात लागलेला पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे. हा पोस्टर ऐन मतमोजणीच्या वेळीच समोर आल्यानं अनेक अंदाज बांधले जात आहेत. भाजपानं मतमोजणीपूर्वीच पराभव स्वीकार केलेला आहे का?, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.
भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयात लागलेला पोस्टर व्हायरल होत आहे. या पोस्टरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो आहेत. तसेच त्यावर लिहिलं आहे की, विजयानं आम्ही अहंकारी होत नाही, तर पराभवानं आम्ही निराश होत नाही. हा पोस्टर भाजपाच्या दिल्लीतल्या पदाधिकाऱ्यांनी लावला आहे. दुसरीकडे मजमोजणीपूर्वीच भाजपा नेत्यानं विजयाचा दावा केला आहे.
भाजपाचे दिल्लीतले प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी आमचाच विजय होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला आहे. मी आता उदास नाही. भाजपासाठी हा चांगला दिवस ठरेल, अशी मला आशा आहे. आम्ही आज दिल्लीत सत्तेत येणार आहोत. आम्ही जर 55 जागा जिंकलो तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही. तत्पूर्वीही मनोज तिवारी यांनी ट्विट करत 48 जागा जिंकण्याचा दावा केला होता.This poster put up at state BJP office in Delhi, today morning. Does it convey a message even before the results are out ? #NewDelhi#DelhiElections2020#DelhiAssemblyPolls@BJP4Delhi pic credit - Mohit Bhatt pic.twitter.com/40cZZ1Qauf
— Megha Prasad (@MeghaSPrasad) February 11, 2020
Manoj Tiwari, BJP Delhi Chief: I am not nervous. I am confident that it will be a good day for BJP. We are coming to power in Delhi today. Don't be surprised if we win 55 seats. #DelhiResultspic.twitter.com/3xPHnd6qNf
— ANI (@ANI) February 11, 2020
हनुमान मंदिरात पोहोचले भाजपा नेते विजय गोयल
मतमोजणीपूर्वीच भाजपा नेते आणि राज्यसभा सदस्य विजय गोयल कनॉट प्लेसच्या हनुमान मंदिरात गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात दिल्लीत भाजपाचं सरकार येईल, असा दावाच विजय गोयल यांनी केला आहे. भाजपा आपल्या ताकदीवर बहुमत मिळवेल, अशी आशाही गोयल यांनी व्यक्त केली आहे.
Delhi: BJP leader Vijay Goel offered prayers at Hanuman Temple in Connaught Place. Counting for all 70 assembly seats in Delhi to begin at 8 am. #DelhiResultspic.twitter.com/CDbtQXGAqC
— ANI (@ANI) February 11, 2020