वडिलांचं पंक्चर दुकान अन् पोरगा दिल्लीत आमदार; केजरीवालांच्या 'आप'चा हा मराठी शिलेदार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 04:05 PM2020-02-12T16:05:31+5:302020-02-12T16:06:26+5:30
२०१५ च्या निवडणुकांसारखाच यंदाही आपने मोठा विजय मिळवला. आपनं ६२ जागांवर विजय मिळवलेला असून, गत निवडणुकीच्या तुलनेत ५ जागा कमी झालेल्या आहेत.
नवी दिल्ली - दिल्लीच्या विधानसभा निवडणूक निकालांमध्ये अरविंद केजरीवाल यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याची संधी दिल्लीकरांनी दिली आहे. एकूण ७० जागांपैकी आपचे ६२ आमदार निवडून आले आहेत. यामध्ये एक मराठमोळा आमदारही दिल्ली विधानसभेत निवडून आला आहे. जंगपुरा येथील विधानसभा मतदारसंघात प्रविण देशमुख हे आमदार म्हणून निवडून आले आहेत.
मध्य प्रदेशतील भोपाळ येथील रहिवाशी पी.एन देशमुख गेल्या अनेक वर्षापासून पंक्चरचं दुकान चालवतात. त्यांचा मुलगा प्रविण देशमुख दुसऱ्यांदा आपकडून आमदार म्हणून निवडून आलेला आहे. मूळचं मराठी असलेलं हे देशमुख कुटुंब भोपाळमध्ये वास्तव्यास आहे. २१ डिसेंबर १९८४ मध्ये प्रविण देशमुख यांचा जन्म झाला. शिक्षणात अव्वल असलेल्या प्रविणने सायन्स पदवीधारक असून एमबीएची डीग्रीही घेतली आहे.
अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला प्रभावित होऊन प्रविण देशमुखने नोकरी सोडून सामाजिक कार्यात सहभागी झाला. आंदोलन संपल्यानंतर प्रविणने अरविंद केजरीवालांच्या आप पक्षाचं काम करण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा दिल्ली उपाध्यक्षपदाची जबाबदारी प्रविणने सांभाळली, २०१५ मध्ये दिल्लीत झालेल्या निवडणुकीत आपने त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत प्रविणचा विजय झाला.
प्रविण देशमुख आमदार झाल्यानंतरही त्याचे वडील पी.एन देशमुख भोपाळमध्ये पंक्चरचं दुकान चालवत होते. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा प्रविण देशमुख आमदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र वडील पीएन देशमुख कोणताही गर्व न बाळगता पंक्चर काढण्याचं काम करतात. दिल्लीच्या रणांगणात आप पक्षाविरोधात भाजपाने सर्व ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे १०० हून अधिक खासदार दिल्लीत प्रचारासाठी आले होते. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीकरांनी विश्वास ठेवला. तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
२०१५ च्या निवडणुकांसारखाच यंदाही आपने मोठा विजय मिळवला. आपनं ६२ जागांवर विजय मिळवलेला असून, गत निवडणुकीच्या तुलनेत ५ जागा कमी झालेल्या आहेत. भाजपाला या निवडणुकीत ८ जागाच राखता आल्या. तर काँग्रेसच्या ६७ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. दरम्यान, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत झालेल्या पराभवामुळे भाजपाची चिंता वाढलेली आहे. भाजपाला दिल्लीतली सत्ता हवी होती, त्यासाठी त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती पण दिल्लीत लाजिरवाणा पराभव झाला.
महत्त्वाच्या बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देणार अरविंद केजरीवाल? 'आप'चा राष्ट्रीय राजकारणात शिरकाव
पश्चिम बंगालमध्येही मिळणार मोफत वीज; महाराष्ट्रात अजित पवार नकारात्मक
'बजरंगबलीच्या कृपेनं जिंकलात, आता शाळा-मदरशांमध्ये हनुमान चालिसा शिकवा'
...म्हणून अरविंद केजरीवाल यांना कुटुंबीय म्हणायचे 'कृष्ण'
'आप'मधून बाहेर पडले... भाजपा, काँग्रेसकडून लढले... निवडणुकीत गडगडले!