Delhi Election: दिल्लीकरांकडून देशाच्या राजकारणाला कलाटणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 06:28 AM2020-02-12T06:28:44+5:302020-02-12T08:13:24+5:30

अरविंद केजरीवाल : काम करणाऱ्यालाच दिली मते; हनुमान मंदिरात जाऊ न घेतले दर्शन

Delhi election result will give turning point of india's politics | Delhi Election: दिल्लीकरांकडून देशाच्या राजकारणाला कलाटणी

Delhi Election: दिल्लीकरांकडून देशाच्या राजकारणाला कलाटणी

Next

नवी दिल्ली : या निकालांनी नव्या राजकारणाचा जन्म झाला आहे. काम करणाºयालाच मत मिळेल, असा स्पष्ट संदेश देत दिल्लीकरांनी देशातील राजकारणाला कलाटणी दिली आहे, या शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दमदार विजयानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.


आम आदमी पार्टीच्या कार्यालयात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक गोळा झाले होते. ‘लगे रहो केजरीवाल’च्या घोषणा सुरू होत्या. केजरीवाल यांचे मंचावर आगमन होताच एकच जल्लोष झाला. केजरीवाल यांनी पहिल्याच वाक्यात निवडणुकीतील विजय दिल्लीकरांना समर्पित केला.
ते म्हणाले, ज्यांनी मला आपल्या कुटुंबातील मुलगा म्हणून स्वीकारले त्या दिल्लीकरांचा हा विजय आहे. विकासाचे आणि कामाचे राजकारण करणाऱ्यांचा हा विजय आहे. या निकालामुळे संपूर्ण देशातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. जो दर्जेदार शिक्षण देईल, जो मोहल्ला क्लिनिक देईल, चोवीस तास वीज देईल, स्वच्छ पाणी देईल त्यालाच मत मिळेल, अशालाच दिल्लीकरांनी विजयी केले. देशासाठी हा शुभ संदेश आहे, हा संपूर्ण देशाचा विजय आहे, असे सांगून केजरीवाल यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि खंबीरपणे पाठीशी उभे राहणाºया कुटुंबीयांचे आभार मानले.



माझा वाढदिवस आम्ही केक कापून साजरा केला, पण खरे सेलिब्रेशन निकालामुळे झाले. माझ्यासाठी अरविंद यांच्याकडून मिळालेले हेच सर्वांत मोठे गिफ्ट आहे. - सुनीता केजरीवाल, पत्नी

भाजपला टोला
च्हनुमान मंदिरात जाण्यावरून भाजपने केजरीवाल यांना लक्ष्य केले होते. भाषणाला सुरुवात करताना केजरीवाल यांनी ‘आज मंगलवार है’ असे म्हटताच टाळ्यांचा कडकडाट आणि हास्याचे कारंजे फुलले.
च्मी हनुमानाच्या दर्शनासाठी नक्की जाईन. त्यांची दिल्लीकरांवर कृपा झाली आहे. या विजयासाठी त्यांचेही आभार मानणार आहे, असे म्हणून त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला.
केक कुठे आहे?
च्केजरीवाल यांनी कुटुंबीयांचे आभार मानताना ‘आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे’, असे सांगितले.
च्तोच गर्दीतून ‘केक कुठे आहे’, असा आवाज आला. त्यावर ‘मी केक खाल्ला, तुम्हालाही मिळेल’, असे म्हणून केजरीवाल यांनी निरोप घेतला.
दिल्लीकरांनी दिलेला जनादेश आम्ही स्वीकारला आहे. विधानसभेत चांगला विरोधी पक्ष म्हणून काम करू. अरविंद केजरीवाल व आम आदमी पक्षाचे स्वागत करतो. दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी हे सरकार काम करेल, अशी आशा करतो.
- जे.पी. नड्डा, अध्यक्ष, भाजप

जनतेसाठी काम करणाºया सरकारला जनतेने पुन्हा संधी दिली आहे. भाजपने घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा फायदा झाला नाही. शिक्षण, आरोग्यासह जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर आम्ही काम केले. पुढील पाच वर्षेही अशाच प्रकारे आम्ही काम करू. केजरीवाल हे दिल्लीचे बेटे आहेत, हे दोन कोटी जनतेने दाखवून दिले आहे. ठोस काम आम्ही करुन दाखवू.
- मनिष सिसोदिया, उपमुख्यमंत्री

भाजप कार्यकर्त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अतोनात परिश्रम घेतले. प्रदेश अध्यक्ष या नात्याने भाजपच्या कामगिरीची जबाबदारी माझीच आहे. लोकांचा कौल आम्हाला मान्य आहे. आमच्यासाठी हा निकाल अनपेक्षित आहे.
- मनोज तिवारी, प्रदेशाध्यक्ष भाजप

Web Title: Delhi election result will give turning point of india's politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.