Delhi Election Results : 'आप'च्या विजयानंतर रामदास आठवलेही म्हणाले, 'लगे रहो केजरीवाल' !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 04:42 PM2020-02-11T16:42:13+5:302020-02-11T16:43:50+5:30

दिल्लीतील पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. त्याचवेळी भाजपने गेल्यावेळच्या तुलनेत प्रगती केली आहे. केजरीवाल यांना शुभेच्छा. आणखी चांगेल काम करावे, असं सांगत आठवले यांनी 'लगे रहो केजरीवाल' म्हटले. 

Delhi Election Results: After the victory of AAP, Ramdas Athawale also said, 'Stay tuned Kejriwal'! | Delhi Election Results : 'आप'च्या विजयानंतर रामदास आठवलेही म्हणाले, 'लगे रहो केजरीवाल' !

Delhi Election Results : 'आप'च्या विजयानंतर रामदास आठवलेही म्हणाले, 'लगे रहो केजरीवाल' !

Next

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे आकडे समोर येत असून, पुन्हा आम आदमी पार्टीचं सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आम आदमी पक्षाच्या शानदार विजयानंतर अरविंद केजरीवाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. त्यात आरपीआयचे नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचाही समावेश झाला आहे.

नेहमीच आपल्या बिनधास्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आठवले यांनी केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या आहे. आठवले म्हणाले की, काही महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने येथील सातच्या सात जागा जिंकल्या होत्या. मात्र केजरीवाल यांनी दिल्लीत वीज मोफत, पाणी मोफत, बस मोफत, मेट्रो मोफत दिली. सगळ मोफत-मोफत दिल्यामुळे दिल्लीकरांनी ठरवले की, दिल्लीसाठी केजरीवाल आणि केंद्र सरकारसाठी मोदीजी. भाजपने प्रयत्न केला. मात्र मुस्लिमांची मते भाजपला मिळाली नाही. त्यामुळे त्यांना सत्ता मिळविण्यात अपयश आल्याचे आठवलेंनी नमूद केले. 

भारतीय जनता पक्षाने काही प्रमाणात भाषा चुकीची वापरली. त्याचा काही प्रमाणात परिणाम झाला आहे. मात्र मुस्लीम मते मिळाली नसल्याने भाजपचा पराभव झाल्याचे आठवले यांनी सांगितले.  

दरम्यान दिल्लीतील पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. त्याचवेळी भाजपने गेल्यावेळच्या तुलनेत प्रगती केली आहे. केजरीवाल यांना शुभेच्छा. आणखी चांगेल काम करावे, असं सांगत आठवले यांनी 'लगे रहो केजरीवाल' म्हटले. 
 

Web Title: Delhi Election Results: After the victory of AAP, Ramdas Athawale also said, 'Stay tuned Kejriwal'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.