Delhi Election Results: दिल्ली म्हणते 'लगे रहो केजरीवाल'; पण अडकले मुख्यमंत्र्यांचे दोन महत्त्वाचे साथीदार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 12:44 PM2020-02-11T12:44:48+5:302020-02-11T12:47:03+5:30

Delhi Assembly Election Results Updates: मुख्यमंत्र्यांचे दोन महत्त्वाचे साथीदार पिछाडीवर

Delhi Election Results arvind kejriwal leading manish sisodia and atishi marlena trailing | Delhi Election Results: दिल्ली म्हणते 'लगे रहो केजरीवाल'; पण अडकले मुख्यमंत्र्यांचे दोन महत्त्वाचे साथीदार

Delhi Election Results: दिल्ली म्हणते 'लगे रहो केजरीवाल'; पण अडकले मुख्यमंत्र्यांचे दोन महत्त्वाचे साथीदार

googlenewsNext

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीला स्पष्ट कौल दिला आहे. आपनं ५६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा १४ मतदारसंघांत पुढे आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा आपचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे. 

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आघाडीवर आहेत. केजरीवालांनी जबरदस्त आघाडी घेत विजय जवळपास निश्चित केला आहे. केजरीवालांना आतापर्यंत १७ हजार ७५६ मतं मिळाली. केजरीवालांसमोर भाजपाच्या सुनील यादव यांचं आव्हान आहे. यादव यांना आतापर्यंत ७ हजार ९४१ मतं मिळाली आहेत. आतापर्यंतची मजमोजणी लक्षात घेतल्यास केजरीवालांना ६४ टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत.

केजरीवालांचे निकटवर्तीय आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया मात्र पतपारगंज मतदारसंघात पिछाडीवर आहेत. सिसोदिया यांना आतापर्यंत ३४ हजार २२२ मतं मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी रविंदर सिंग नेगी यांना ३५ हजार ८१ मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात सिसोदिया मागे पडल्यानं आपला धक्का बसला आहे. सिसोदिया यांच्यासोबत आपच्या अतिषी मार्लेनादेखील पिछाडीवर आहेत. मार्लेना यांच्यासमोर भाजपाच्या धरमबीर सिंग यांचं आव्हान आहे. त्यांना आतापर्यंत २३ हजार ५९ मतं मिळाली आहेत. तर मार्लेना यांना २२ हजार ८८७ मतं मिळाली आहेत. 
 

Web Title: Delhi Election Results arvind kejriwal leading manish sisodia and atishi marlena trailing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.