Delhi Election Results : अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारीला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 11:39 AM2020-02-12T11:39:21+5:302020-02-12T13:45:00+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2020मध्ये पुन्हा एकदा मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2020मध्ये पुन्हा एकदा मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारीला दिल्लीतल्या रामलीला मैदानात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. अशा प्रकार केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. 2015च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसारखंच यंदा आपनं मोठा विजय मिळवला.
आपनं 62 जागांवर विजय मिळवलेला असून, गेल्या वेळच्या तुलनेत 5 जागा कमी झालेल्या आहेत. भाजपाला या निवडणुकीत 8 जागाच राखता आलेल्या आहेत. काँग्रेसची कामगिरी गेल्या निवडणुकीसारखीच निराशाजनक राहिली आहे. त्यांच्या 63 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. आपला 62 जागांसह आपला 53.57 टक्के मतं मिळाली आहेत, तर भाजपाला 38.51 टक्के मतं मिळाली आहेत.
काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही, त्यांना 4.26 टक्के मतं मिळालेली आहेत. आता आपच्या नव्या कॅबिनेटचीही चर्चा सुरू झाली आहे. मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, राजेंद्र पाल गौतम यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.Aam Aadmi Party (AAP) chief Arvind Kejriwal to take oath as the Chief Minister of Delhi on 16th February, at Ramlila Maidan. pic.twitter.com/gABczDBoCw
— ANI (@ANI) February 12, 2020