गंभीर नसता तर भाजपाची अवस्था झाली असती आणखी गंभीर; जाणून घ्या कशी?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 05:28 PM2020-02-12T17:28:24+5:302020-02-12T17:33:34+5:30

भारतीय जनता पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ७० सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेमध्ये भाजपाला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

Delhi Election Results : If their no Support from Gambhir's Constituency, the BJP would have been in more trouble | गंभीर नसता तर भाजपाची अवस्था झाली असती आणखी गंभीर; जाणून घ्या कशी?

गंभीर नसता तर भाजपाची अवस्था झाली असती आणखी गंभीर; जाणून घ्या कशी?

Next

नवी दिल्ली - केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ७० सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेमध्ये भाजपाला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले. आपच्या झंझावातात दिल्लीतील लोकसभेच्या सातही मतदारसंघावर कब्जा असलेल्या भाजपाला यापैकी तीन मतदारसंघात खातेही उघडता आले नाही. मात्र माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या मतदरसंघातील काही मतदारांनी साथ दिल्याने भाजपावरील मोठी नामुष्की टळली. 

प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य करणारे परवेश वर्मा, महिला नेत्या मीनाक्षी लेखी आणि भाजपाचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते हर्षवर्धन यांच्या मतदारसंघात भाजपाचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. मात्र माजी क्रिकेटपटू आणि सध्या भाजपाचा खासदार असलेल्या गौतम गंभीरच्या मतदारसंघाने कमळाला साथ देत भाजपाची घसरगुंडी रोखली. गंभीर प्रतिनिधित्व करत असलेल्या जागा पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपाने सर्वाधिक तीन जागा जिंकल्या. या मतदारसंघातील गांधीनगर, विश्वासनगर, लक्ष्मीनगर विधानसभा मतदारसंघात कमळ फुलले. त्यामुळेच भाजपला आपला जाागांचा आकडा किमान ८ पर्यंत पोहोचवता आला. लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीरने या मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला होता. 



गंभीरप्रमाणेच भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष असलेल्या मनोज तिवारी यांच्या मतदारसंघातील मतदारांनीही भाजपाला थोडीशी साथ दिली. मनोज तिवारी हे प्रतिनिधित्व करत असलेल्या उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील घोंडा आणि रोहतासनगर येथे भाजपाचे उमेदवार विजयी झाले. 

अमित शाह-नितीश कुमार यांनी सभा घेतलेल्या मतदार संघातच लाजिरवाणा पराभव

Delhi Election Result: पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देणार अरविंद केजरीवाल? 'आप'चा राष्ट्रीय राजकारणात शिरकाव

Delhi Election Results: केजरीवालपुत्राचा भाजपाला चिमटा; मुलीला तर कॉन्फिडन्सच होता!

तर रमेश बिधुडी खासदार असलेल्या दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातील बदरपूर विधानसभा मतदारसंघ आणि हंसराज हंस खासदार असलेल्या पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातील रोहिणी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी झाले. 

Web Title: Delhi Election Results : If their no Support from Gambhir's Constituency, the BJP would have been in more trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.