Delhi Election : 'दिल्लीकरांच्या मेहनतीची खिल्ली उडवणे अमित शहांना शोभा देत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 10:08 AM2020-01-27T10:08:58+5:302020-01-27T10:09:18+5:30

भाजपने आमच्याकडून प्रेरणा घेऊन हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शाळांचा दर्जा सुधारायला हवा, असेही केजरीवाल यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

Delhi Elections Arvind Kejriwal Released Video | Delhi Election : 'दिल्लीकरांच्या मेहनतीची खिल्ली उडवणे अमित शहांना शोभा देत नाही'

Delhi Election : 'दिल्लीकरांच्या मेहनतीची खिल्ली उडवणे अमित शहांना शोभा देत नाही'

Next

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटरवर व्हिडिओ पोस्ट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

केजरीवाल म्हणाले की, 'मी गेल्या काही दिवसांपासून पाहत आहे की, अमित शाह आपल्या प्रचार सभेमध्ये दिल्लीकरांचा अपमान करत आहेत. दिल्लीकरांनी आपल्या मेहनतीने शाळा, रुग्णालय सुधारली आहेत. मात्र अमित शहा हे दिल्लीतील शाळांचा आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा अपमान करत आहे'. त्यामुळे बरेच पालक दुखावले असल्याचा दावा सुद्धा केजरीवाल यांनी यावेळी केला.

तर, दिल्लीतील सरकारी शाळाचा निकाल 96 टक्के लागला आहे. एवढा चांगला निकाल आतापर्यंत कोणत्याच राज्यात लागला नाही. हे दिल्लीकरांच्या मेहनतीचे फळ आहे. मात्र, शहा हे आपल्या भाषणातून त्याच्या मेहनतीचा अपमान करत आहे. खरे तर भाजपने आमच्याकडून प्रेरणा घेऊन हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शाळांचा दर्जा सुधारायला हवा, असेही केजरीवाल यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.


 


 

Web Title: Delhi Elections Arvind Kejriwal Released Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.