Delhi Excise Case: दिल्ली मद्य घोटाळ्यात केसीआर यांच्या मुलीचे नाव; CBI ने जारी केले समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 07:47 PM2022-12-06T19:47:15+5:302022-12-06T19:48:11+5:30
Delhi Excise Case: दिल्ली मद्य घोटाळ्यातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात के. कविता यांचे नाव आले आहे.
नवी दिल्ली: दिल्ली अबकारी घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मंगळवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांची कन्या आणि तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) विधान परिषद सदस्य के. कविता यांना 11 डिसेंबर रोजी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.
यापूर्वी केंद्रीय एजन्सीने कविता यांना 6 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावले होते. सीबीआयने 2 डिसेंबर रोजी कविताला फौजदारी प्रक्रिया संहिता (CRPC) च्या कलम 160 अंतर्गत नोटीस जारी केली होती आणि 6 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता तिच्या सोयीनुसार चौकशीसाठी बोलावले होते.
कविता यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये सीबीआयने म्हटले की, "दिल्ली अबकारी घोटाळा प्रकरणाच्या तपासादरम्यान काही तथ्य समोर आले आहेत, ज्याची तुमच्याकडे (कविता) माहिती असू शकते, त्यामुळे तुमची चौकशी करणे आवश्यक आहे." दिल्ली दारू घोटाळ्यातील कथित लाचखोरीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या रिमांड अहवालात के. कवितांचे नाव समोर आल्यानंतर तिने कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले होते.