दिल्ली सामूहिक बलात्कार - दोघांच्या फाशीला स्थगिती
By admin | Published: July 14, 2014 04:46 PM2014-07-14T16:46:20+5:302014-07-14T19:13:46+5:30
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन गुन्हेगारांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.
Next
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १४ - दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन गुन्हेगारांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. डिसेंबर २०१२मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार व हत्येप्रकरणी सहा जणांना दोषी धरण्यात आले होते. यामधील रामसिंगने तिहार तुरुंगात आधीच आत्महत्या केली होती. तर एक गुन्हेगार अल्पवयीन आहे. उरलेल्या अक्षय ठाकूर, मुकेश, पवन गुप्ता व विनय शर्मा यांपैकी दोघांच्या फाशीला आधीच स्थगिती देण्यात आली होती. सत्र न्यायालयाने अत्यंत जलदगतीने निवाडा देताना या सर्वांना गुन्हेगार ठरवताना हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे सांगत फाशीची शिक्षा दिली होती. अल्पवयीन गुन्हेगार कायद्याचा आधार घेत तीन वर्षांत मोकळा होण्याची शक्यता आहे. तर उरलेल्या चारही गुन्हेगारांनी सुप्रीम कोर्टाकडे सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाद मागितली होती.
आता सुप्रीम कोर्ट पुन्हा दोन्ही पक्षांची बाजू ऐकून आपला निर्णय देणार आहे. मात्र सध्यातरी या चौघांची फाशी तात्पुरती टळली आहे. या अमानुष सामूहिक बलात्कारानंतर संपूर्ण देश हादरला होता आणि त्यानंतर बलात्का-यांना कठोर शासन करणारा निर्भया कायदा अस्तित्वात आला होता. मात्र, आता सुप्रीम कोर्ट सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवते की हा गुन्हा दुर्मिळातला दुर्मिळ नसल्याचे ठरवत त्यांची फाशी रद्द करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे..