डेंग्यूच्या संकटात दिल्लीकर वाऱ्यावर : कोर्ट
By admin | Published: October 7, 2016 01:59 AM2016-10-07T01:59:21+5:302016-10-07T01:59:21+5:30
राजधानी दिल्लीतील चिकुनगुनिया आणि डेंग्यू या आजारांबाबत अधिकारी काही करण्यास इच्छुक नाहीत, तर या रोगांना तोंड देण्यासाठी नागरिकांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील चिकुनगुनिया आणि डेंग्यू या आजारांबाबत अधिकारी काही करण्यास इच्छुक नाहीत, तर या रोगांना तोंड देण्यासाठी नागरिकांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली.
डेंग्यू आणि चिकुनगुनिया या आजारांना रोखण्यासाठी नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांची बुधवारी बैठक झाली. मात्र, याच्या परिणामांबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. न्या. एम. बी. लोकुर आणि न्या. अमिताव राव यांच्या पीठाने स्पष्ट केले की, या आजारांना रोखण्यासाठी हे इच्छुक नाहीत. दिल्लीच्या नागरिकांना या आजारांना तोंड देण्यासाठी वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहे. या प्रकरणी आजच तत्काळ बैठक घ्या, अशी सूचनाही न्यायालयाने नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांना केली. या सुनावणीसाठी दिल्ली सरकारच्या वतीने हजर असलेल्या सॉलिसिटर जनरल रंजीत कुमार यांनी न्यायालयाला सांगितले की, नायब राज्यपाल नजीब जंंग हे लवकरच एक बैठक बोलावतील. यात वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्या बैठकीत भाग घेणाऱ्यांना न्यायालयाने निर्देश दिले आहेत की, या रोगांच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी उपायांबाबत विचारविमर्श करण्याची गरज आहे. पुढील सुनावणी आता १७ तारखेला होणार आहे.