थट्टा-मस्करी करणं बेतलं जीवावर, टेरेसवर एकमेकांना गुदगुल्या करत होते दोन मित्र अन् झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 03:19 PM2021-01-25T15:19:36+5:302021-01-25T15:24:37+5:30
Delhi News : कधी कधी मस्करी जीवावरही बेतू शकते. अशीच एक मन सुन्न करणारी घटना आता समोर आली आहे.
नवी दिल्ली - मित्र-मैत्रिणींमध्ये थट्टा-मस्करी ही हमखास केली जाते. मात्र अनेकदा हसता हसता त्या मस्करीची कुस्करी होते आणि वाद निर्माण होतात. तर कधी ही मस्करी जीवावरही बेतू शकते. अशीच एक मन सुन्न करणारी घटना आता समोर आली आहे. टेरेसवर एकमेकांना गुदगुल्या करताना दोन मित्रांचा तोल गेला आहे. टेरेसवरून पडून दोन मित्रांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने दिल्ली हादरली आहे. या घटनेनंतर दोघांनाही तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या गीता कॉलनी परिसरात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मृत्यू झालेले दोन्ही मित्र हे एकाच फॅक्टरीत काम करणारे होते. एकाच फॅक्टरीत काम करणारे दोघं मित्र दुपारच्या वेळेस फॅक्टरीच्या टेरेसवर जेवण करण्यासाठी गेले होते. जेवताना ते थट्टा-मस्करी करत होते. मात्र थोड्यावेळाने त्यांनी एकमेकांना गुदगुल्या करायला सुरूवात केली आणि तोल जाऊन ते अचानक टेरेसवरुन खाली पडले. शफिक आणि शकिल अशी या दोघांची नाव असून यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.
धक्कादायक! पीडितांमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेशhttps://t.co/O9XvXYCNDR#Rape#crime#Police
— Lokmat (@MiLOKMAT) January 25, 2021
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शफिक दिल्लीच्या जाफराबाद परिसरात पत्नी आणि अन्य कुटुंबियांसोबत राहत होता. तर शकिलचं घरही त्याच्या जवळच आहे. हे दोघंही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. शफिक आणि शकिल हे दोघेही मुकेश दुआ नावाच्या व्यापाऱ्याच्या फॅक्टरीत काम करत होते. रेडीमेड कपड्यांचा फॅक्टरीत ते कामाला होते. फॅक्टरीच्या टेरेसवर फक्त पायऱ्यांसाठी दरवाजा असून कोणतीही सुरक्षा भिंत नव्हती. त्यामुळेच एकमेकांना गुदगुल्या करताना ते खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी, लोकांमध्ये संतापाचं वातावरणhttps://t.co/wVZe2f4Ij3#TikTok
— Lokmat (@MiLOKMAT) January 24, 2021
मेंढ्या चारत असताना चुकून केला होता पाकिस्तानमध्ये प्रवेश, झाली होती अटक https://t.co/5NY1oe1Qbn#Gujarat#India#Pakistan
— Lokmat (@MiLOKMAT) January 24, 2021