२ आयपीएस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दिल्ली सरकार झालं अलर्ट
By पूनम अपराज | Published: December 12, 2020 08:55 PM2020-12-12T20:55:33+5:302020-12-12T20:56:14+5:30
CoronaVirus सीमेच्या सुरूवातीस ग्रीन रुग्णवाहिका ठेवण्यात आली असून डॉक्टरांची टीम सकाळपासूनच चाचण्या, नमुने घेण्यात व्यस्त आहे.
सिंघु सीमेवरील तैनात दोन आयपीएस अधिकारी अलीकडे कोरोना पॉझिटिव्ह आढळले, त्यानंतर दिल्ली सरकारकडून सिंघु सीमेवर नि: शुल्क कोविड -१९ चाचण्या घेतल्या जात आहेत. सीमेच्या सुरूवातीस ग्रीन रुग्णवाहिका ठेवण्यात आली असून डॉक्टरांची टीम सकाळपासूनच चाचण्या, नमुने घेण्यात व्यस्त आहे. बहुतांश पोलीस चाचणी करून घेण्यासाठी पोहोचत आहेत, मात्र आंदोलक शेतकरी चाचणीसाठी पोहोचलेले नाहीत.
दररोज 200 चाचण्या
डॉ. अनुपम वशिष्ठ यांनी एबीपी न्यूजशी बातचीत करताना म्हटले आहे की, “आम्ही आरटीपीसीआर आणि अँटीजेन दोन्ही चाचण्या करत आहोत. ही सुविधा प्रत्येक व्यक्तीसाठी विनामूल्य आहे. आता आम्ही सुमारे चाळीस चाचण्या घेतल्या असून एका दिवसात दोनशे चाचण्या करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूची 2385 नवीन प्रकरणे नोंदली गेली, तर 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. खबरदारी म्हणून राजधानीत अजूनही सहा हजारहून अधिक कंटेन्टमेन्ट झोन आहेत. शेतकरी आंदोलनातील वाढती गर्दी पाहता साथीचा रोग वाढण्याचा धोका अधिक वाढतो, तर नवीन हॉट स्पॉट देखील निर्माण होण्याचीही शक्यता उद्भवू शकते.
हजारो शेतकरी निषेध करीत आहेत
नवीन कृषी कायद्याविरोधात मागील १६ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सिंधु सीमा, टिकरी, चिल्ला आणि गाझीपूर सीमेवर हजारो शेतकरी जमले आहेत आणि निषेध करत आहेत. शेतकरी आंदोलन पाहता दिल्ली पोलिसांची एक मोठी टीम तैनात करण्यात आली आहे. दिवसेंदिवस सिंधु सीमेवर लोकांची वाढत जाणाऱ्यांची संख्या पाहता साथीचा रोग असलेला कोरोनाला निमंत्रण देत आहे. शेतकरी संघटनांनी 14 डिसेंबरपासून देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला असून आज दिल्ली-जयपूर महामार्ग बंद करुन सर्व टोलनाके ताब्यात घेण्याची घोषणा केली आहे.