Lockdown: "बांधकाम मजुरांना मिळणार पाच हजार रुपयांची मदत"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 05:37 PM2020-05-11T17:37:54+5:302020-05-11T17:50:52+5:30

Lockdown: दिल्ली सरकारच्या या मदतीचा लाभ फक्त नोंदणीकृत मजुरांनाच मिळणार आहे.

delhi govt decides to provide another financial assistance of rs 5000 to construction workers rkp | Lockdown: "बांधकाम मजुरांना मिळणार पाच हजार रुपयांची मदत"

Lockdown: "बांधकाम मजुरांना मिळणार पाच हजार रुपयांची मदत"

Next
ठळक मुद्देकामगार मंत्री गोपाळ राय यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंडळाचे जवळपास 40,000 बांधकाम कामगार नोंदणीकृत आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीतील नोंदणी केलेल्या बांधकाम करणाऱ्या मजुरांना पाच हजार रुपयांची मदत करण्यात येईल, असे दिल्लीचे कामगार मंत्री गोपाळ राय यांनी सोमवारी सांगितले. दिल्ली सरकारने गेल्या महिन्यात बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात पाच हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला होता. या महिन्यात सरकारने त्यांची मदत करण्यासाठी पुन्हा पाच हजार रुपये जमा करण्यात निर्णय घेतला आहे. 

कामगार मंत्री गोपाळ राय यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंडळाचे जवळपास 40,000 बांधकाम कामगार नोंदणीकृत आहेत. या बैठकीत बांधकाम पोर्टल सुरू करण्याचे ठरविले आहे. या पोर्टलवर बांधकाम कामगार स्वतःची नोंदणी करू शकतात. नवीन कामगारांच्या नूतनीकरण व नोंदणीसाठी 15 मेपासून ऑनलाईन नोंदणी देखील सुरू होईल, अशी माहिती गोपाळ राय यांनी दिली. तसेच,  वेबसाइटची लिंक 15 मे पासून सुरु होईल आणि नोंदणी 25 मे पर्यंत सुरू राहील. 25 मे नंतर पडताळणीची प्रक्रिया होईल, असेही गोपाळ राय यांनी सांगितले.

दिल्ली सरकारच्या या मदतीचा लाभ फक्त नोंदणीकृत मजुरांनाच मिळणार आहे. दरम्यान, लोकांच्या समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने घरकामगार, एसी मेकॅनिक, कार मेकॅनिक, सीसीटीव्ही मेकॅनिक, वॉशरमन, सफाई कामगार, इलेक्ट्रीशियन आणि प्लंबर यांना काम करण्याची परवानगी दिली आहे. याशिवाय, पुस्तके आणि स्टेशनरी दुकाने आणि निवासी संकुले सर्व दुकाने उघडतील. तसेच, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रॉनिक माध्यम उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मद्याची दुकाने, पान, गुटख्याची दुकानेही उघडतील. सर्व औद्योगिक वसाहत खुल्या राहतील. पॅकेजिंग मटेरियलची मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स खुली राहतील.

आणखी बातम्या -

विमान सेवा सुरू होणार? एजन्सींच्या पथकाची दिल्ली विमानतळाला भेट!

आजपासून पॅसेंजर ट्रेनसाठी बुकिंग सुरू; पण, यासाठी काय करावं लागेल?

प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी; 'या' गोष्टी करणं बंधनकारक!

Web Title: delhi govt decides to provide another financial assistance of rs 5000 to construction workers rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.