दिल्ली सरकार पहिल्या दिवसापासून खोटं बोलतंंय; खासदार गौतम गंभीरचा 'स्ट्रेट ड्राईव्ह'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 11:35 AM2020-06-10T11:35:38+5:302020-06-10T11:36:40+5:30
स्थलांतरीत मजूरांच्या प्रश्नावरूनही गंभीरनं दिल्ली सरकारवर टीका केली.
भाजपा खासदार आणि भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानं मंगळवारी दिल्ली सरकारवर हल्लाबोल केला. आम आमदी पार्टीच्या सरकारवर टीका करताना गंभीरनं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पहिल्या दिवसापासून खोटं बोलत असल्याचा आरोप केला. त्यानं दिल्ली सरकार कोरोना व्हायरसची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले असल्याचाही दावा केला.
गंभीरनं CNN-News18 ला विषेश मुलाखत दिली. यावेळी गंभीरनं केरळ सरकार आणि क्राँग्रेसच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारचे कौतुक केले. या दोन्ही सरकारनं कोरोना परिस्थिती व्यवस्थित हाताळली. केजरीवाल स्वतःची जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करत राहिले, असेही गंभीर म्हणाला. ''मुख्यमंत्र्यांनी 30000 बेड्सची व्यवस्था केल्याचे जाहीर केले होते, त्याचं काय झालं? ते प्रत्येक दिवशी नंबर बदलत आहेत. दिल्ली सरकार पहिल्या दिवसापासून खोटं बोलत आहेत. त्यांना कोणती जबाबदारी घ्यायची नाही. ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे,''असे गंभीर म्हणाला.
स्थलांतरीत मजूरांच्या प्रश्नावरूनही गंभीरनं दिल्ली सरकारवर टीका केली. तो म्हणाला,''सरकारनं दिल्ली सरकारची जबाबदारी घ्यायला हवी होती. त्यावेळी दररोज 1 लाख लोकांची काळजी घेत असल्याचा दावा दिल्ली सरकारकडून करण्यात आला होता, परंतु 25 लाख लोकांनी दिल्ली सोडलं आहे. दिल्ली सरकार काळजी घेत असताना त्यांनी दिल्ली का सोडलं? त्यांच्याकडे निधीच शिल्लक राहिलेला नाही. निवडणुकीपूर्वी त्यांनी सर्व मोफत सुविधा दिल्या. आता पैसाच शिल्लक राहिला नसल्यानं त्यानी डिसेल, पेट्रोल आणि मद्यावरील टॅक्स वाढवला.''
गंभीरनं यावेळी दिल्ली सरकारसाठी पुन्हा मदतीचा हात पुढे केला. तो म्हणाला,''तुम्हाला मदत हवीय, तर आम्ही सर्व क्षमतेनं करण्यास तयार आहे. मी त्यांना सर्वप्रथम खासदार फंडातून 1 कोटींची मदत केली. दिल्ली हॉस्पिटल्सची परिस्थितीची मला कल्पना होती. त्यामुळे मी त्यांना PPE किट दिले. पण, दिल्ली सरकारलाच आमच्यासोबत काम करायची इच्छा नाही.''
समोर या आणि खरं बोला... पहिल्या दिवसापासून हे सरकार खोटं बोलत आहे. ही परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरलो, हे सांगून टाका. आता मुख्यमंत्री आरोप-प्रत्यारोप करत आहेत, असेही गंभीर म्हणाला.
महेंद्रसिंग धोनीनं दिलं पक्ष्याला जीवदान; कन्येनं सांगितली संपूर्ण हकिकत!
वर्णद्वेषावर इरफान पठाणनं मांडलं परखड मत... व्हायरल होतंय ट्विट!
ICCची चार महत्त्वाच्या नियमांना मंजूरी; क्रिकेटमध्ये दिसतील 'हे' बदल
पाकिस्ताननं 'आशिया चषक' आयोजनाचा हट्ट सोडला; या देशात होणार यंदाची स्पर्धा!